अण्णा द्रमुकला दणका ; जयललितांच्या निवासाचे स्मृतिस्थळ करण्यास स्थगिती

जयललिता (Jayalalithaa) यांच्या या निवासस्थानात कार्यालय, वाचनालय, प्रतिक्षागृह आणि सभागृहाचा समावेश आहे. जयललिता यांच्या आईने १९६० मध्ये ते खरेदी केले होते.
अण्णा द्रमुकला दणका ; जयललितांच्या निवासाचे स्मृतिस्थळ करण्यास स्थगिती
Jayalalithaasarkarnama

नवी दिल्ली : तामिळनाडू्च्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निवासस्थानाचे स्मृतीस्थळात रुपांतर करण्याच्या अण्णा द्रमुक सरकारने (AIADMK) घेतलेला निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने (High Court) रद्द केला आहे. चेन्नईतील आलिशान पोस गार्डन परिसरात जयललिता यांचे ‘वेद निलायम’ हे निवासस्थान आहे.

तब्बल तीन दशके जयललिता यांचे येथे वास्तव्य होते. जयललिता (Jayalalithaa) यांच्या या निवासस्थानात कार्यालय, वाचनालय, प्रतिक्षागृह आणि सभागृहाचा समावेश आहे. जयललिता यांच्या आईने १९६० मध्ये ते खरेदी केले होते.

तत्कालीन मुख्यमंत्री के.पलानीस्वामी यांनी २०१७ मध्ये जयललिता यांच्या स्मरणार्थ त्यांच्या निवासस्थानाचे स्मृतीस्थळात रूपांतर करण्याची घोषणा केली होती. राज्य सरकारने २२ जुलै २०२० रोजी जयललिता यांच्या निवासस्थानाचे स्मृतीस्थळात रूपांतर करण्याचा आदेश दिला होता.

Jayalalithaa
धक्कादायक : वानखेडेंची आई हिंदू की मुस्लिम, मृत्यूचे दोन दाखले

राज्य सरकारच्या या आदेशाविरुद्ध जयललिता यांची पुतणी जे.दीपा जयकुमार आणि भाऊ जे.दीपक यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. निवासस्थानाच्या चाव्या याचिकाकर्त्याकडे सुपूर्द करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला. याबरोबरच या निवासस्थानाचे थकीत करवसुली ही याचिकाकर्त्यांकडून घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने प्राप्तिकर विभागाला दिली आहे. ही करवसुली कोट्यावधीं रुपयांची आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगडाला भेट देणार

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj)यांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे ता. ७ डिसेंबर रोजी दुर्गराज रायगडावर येत आहे, अशी माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. संभाजीराजे टि्वट करीत ही माहिती दिली आहे. खासदार संभाजीराजेंनी राष्ट्रपती कोविंद (president ramnath kovind) यांना रायगड भेटीसाठी निमंत्रण दिले होते, हे निमंत्रण राष्ट्रपतींनी स्वीकारले आहे. आपल्या टि्वटमध्ये संभाजीराजे म्हणतात की, राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांना मी दुर्गराज रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. यास प्रतिसाद देत राष्ट्रपती महोदय दि. ७ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देत आहेत, हि आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in