Digvijay Singh : काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्याने पोलिसाची कॉलर पकडली ; भाजप आक्रमक

Digvijay Singh |मध्य प्रदेशचे आरोग्यमंत्री विश्वास सारंग यांनी याप्रकरणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे.
Digvijay Singh news update
Digvijay Singh news updatesarkarnama

भोपाळ : मध्य प्रदेशात पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप-काँग्रसमध्ये वाद निर्माण झाला आहे. माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी एका पोलिसाची कॅालर पकडली. याबाबतचा व्हिडिओ कालपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरुन मध्यप्रदेशाचे राजकारण तापलं आहे. (Digvijay Singh news update)

काल (शुक्रवार) मंत्री भुपेंद्र सिंह यांनी काही जण आपल्या कारमधून मतदान करण्यासाठी घेऊन जात होते, तेव्हा माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्यसभेचे खासदार दिग्विजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी भूपेंद्र सिंह यांची कार रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आमने-सामने आहे. त्यामुळे येथे काही काळ तणाव होता.

भाजप-काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा होत असताना पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दिग्विजय सिंह यांनी एका पोलिसाची कॅालर पकडली. याबाबतचा व्हिडिओ कालपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Digvijay Singh news update
राज्यपालांना कोल्हापुरी जोडा दाखवा ; उद्धव ठाकरेंची जहरी टीका

मध्य प्रदेशचे आरोग्यमंत्री विश्वास सारंग यांनी याप्रकरणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. "काँग्रेसने दिग्विजय सिंह यांना गुन्हेगार काँग्रेसचा अध्यक्ष बनविले पाहिजे," असे त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

विश्वास सारंग म्हणाले, "मध्य प्रदेशाच्या इतिहास कालचा (शुक्रवार) दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. ५१ जिल्हा पंचायत जागांपैकी ४१ जागांवर भाजपचे बाजी मारली आहे. काँग्रेसने वाद करुन लोकशाहीचा अपमान केला आहे. दिग्विजय सिंह यांनी भोपाळमधील गुंडाच्या मदतीने मतदान रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांची कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केला आहे,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com