खबरदार! कोरोनाची लस घेतली नसल्यास आता दारूही मिळणार नाही

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. यामुळे सरकारने कोरोना लसीकरणावर भर दिला आहे.
खबरदार! कोरोनाची लस घेतली नसल्यास आता दारूही मिळणार नाही
LiquorSarkarnama

भोपाळ : देशात कोरोनाचा (Covid-19) प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. यामुळे सरकारने कोरोना लसीकरणावर (Covid Vaccination) भर दिला आहे. परंतु, अनेक नागरिक कोरोना लस घेणे टाळत असल्याचे निदर्शनास आले आहेत. यासाठी लस न घेतलेल्या नागरिकांचे रेशन आणि दूध बंद करण्याचा निर्णय मध्य प्रदेश सरकारने घेतला होता. आता मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात लसीकरण न झालेल्या नागरिकांना दारू (Liquor) मिळणार नाही.

भाजपची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशात हा अजब निर्णय घेण्यात आला आहे. खांडवा जिल्हा प्रशासनाने याबाबत आदेश काढला आहे. यानुसार कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाच दारू मिळणार आहे. दारू विक्री दुकाने संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींना विक्री करतील, असे प्रशासनाने म्हटले आहे. या आदेशामुळे मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली असून, राज्यातील इतर जिल्ह्यांतही याचे अनुकरण केले जाण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

दरम्यान, सरकारने नागरिकांनी लस न घेतल्यास त्यांच्या सोईसुविधा कमी करण्याचेही ठरवले आहे. यानुसार लस न घेतलेल्या नागरिकांचे रेशन आणि दूध बंद होणार आहे. रेशनिंग दुकानदार आता नागरिकांना रेशन देताना त्यांनी लस घेतल्याची विचारणा करीत आहेत. लस न घेतल्यास रेशन मिळणार नाही, याची पूर्वसूचनाही ते देत आहेत. काही ठिकाणी लस न घेतलेल्या नागरिकांनी हॉटेलमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी लस न घेतलेल्या नागरिकांचे दूध वितरण बंद करण्यात आले आहे. राज्यात 1.15 कोटी कुटुंबांतील 4.9 कोटी नागरिकांनी स्वस्त दरात रेशन मिळते. लसीकरण न झालेल्यांचे रेशन बंद करण्याचा आदेशही अन्न व पुरवठा विभागाने काढला आहे.

Liquor
मोदी सरकारच्या अडचणीत वाढ; सुरजेवालांची थेट सर्वोच्च न्यायालयात धाव

देशात सध्या 5 कोरोना लशी उपलब्ध आहेत. देशातील लस उत्पादक कंपनी बायोलॉजिकल ई लिमिटेडच्या माध्यमातून या लशीचा पुरवठा होणार आहे. आधी देशात कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुटनिक आणि मॉडर्ना या चार लशींचा वापर लसीकरणासाठी होत होता. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. कोव्हॅक्सिन लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे. जॉन्सन अँड जॉन्सनच्या या सिंगल डोस कोरोना लशीच्या तातडीच्या वापरासही सरकारने परवानगी दिली आहे.

Liquor
स्मृती इराणी बनल्या लेखिका अन् कादंबरीचं नाव 'लाल सलाम'!

सध्या देशात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in