Deputy Collector Nisha Bangre
Deputy Collector Nisha Bangre Sarkarnama

Madhya Pradesh Politics : उपजिल्ह्याधिकाऱ्यांना राजकारणाची भुरळ ; लवकरच BJP कडून निवडणुकीच्या रिंगणात..

Deputy Collector Nisha Bangre will enter Politics : त्या आमला विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याचे समजते.

Deputy Collector Nisha Bangre will enter Politics : मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील लवकुशनगर येथील उपजिल्हाधिकारी निशा बांगरे यांची लवकरच राजकारणात एन्ट्री होणार आहे. प्रशासकीय सेवेचा राजीनामा देऊन लवकरच त्या राजकारणात सक्रिय होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहे. (Madhya Pradesh Deputy Collector Nisha Bangre will enter Politics can contest amla vidhansabha elections)

उपजिल्हाधिकारी पदाचा राजीनामा देऊन निशा बांगरे या कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढविणार हे अद्याप गुलदस्तातच आहे.

"बैतुल येथे माझी पहिली पोस्टिंग होती, येथील कामामुळे जनतेशी संपर्क आला. मी राजकारणात यावं, अशी जनतेची इच्छा आहे. सध्या तर मी सरकारी नोकर आहे. पण पुढे काही राजकीय समीकरणं जुळून आली तर मी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे," असे निशा बांगरे यांनी सांगितले. त्या आमला विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याचे समजते.

Deputy Collector Nisha Bangre
Shiv Sena News : पिंपरी-चिंचवडमधील ठाकरे गटाचा नेता शिवसेनेच्या गळाला

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खतुराहोचे खासदार विष्णुदत्त शर्मा यांच्या मतदार संघातील लवकुशनगरच्या उपजिल्हाधिकारी म्हणून सध्या बांगरे या कार्यरत आहेत. त्या भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याचे बातम्या येत आहेत. राजीनामा दिल्यानंतर कुठल्या पक्षात जाणार याबाबत बोलण्यास निशा बांगरे यांनी नकार दिला आहे.

Deputy Collector Nisha Bangre
Maharashtra politics : मुख्यमंत्री होणे हेच अजितदादांचे अंतिम ध्येय ; सुळेंना नेतृत्व मिळाले तर वडिलांची उंची गाठण्यासाठी..

निशा या अभियांत्रिकीच्या पदवीधर आहेत. त्यांनी काही दिवस गुरुग्राम येथील एका मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी केली आहे. नोकरी करीत असताना त्यांनी प्रशासकीय सेवेत येण्यासाठी स्पर्धा परिक्षांचा अभ्यास केला.

त्यात यश मिळाल्यानंतर २०१६ मध्ये त्या मध्यप्रदेशात डीएसपी म्हणून रुजू झाल्या. २०१७ मध्ये त्यांची उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली. सध्या त्या छतरपूर जिल्ह्यातील लवकुशनगरच्या उपजिल्हाधिकारी आहेत. त्यांचे पती एका मल्टीनॅशनल कंपनीत वरिष्ठ अधिकारी आहेत.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in