भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेस नेत्याला दिले आव्हान अन् अडचणीत आला भाजपचाच बडा नेता

विधानसभा पोटनिवडणुकांमुळे मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण तापले आहे. राज्यात प्रचाराला जोर चढला असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.
madhya pradesh bjp state president challenges congress leader
madhya pradesh bjp state president challenges congress leader

भोपाळ : मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकांत सत्ताधारी भाजप विरुद्ध काँग्रेस असा जोरदार सामना रंगला आहे. एका काँग्रेस नेत्याने भाजपमध्ये येण्यासाठी 50 कोटी रुपयांसह मंत्रिपदाची ऑफर आली होती, असा दावा केला होता. यावर भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी या काँग्रेस नेत्याला आव्हान देत ऑफर देणाऱ्याचे नाव जाहीर करण्याचे आव्हान दिले होते. काँग्रेस नेत्याने अखेर हे आव्हान स्वीकारून भाजपच्याच एका बड्या नेत्याचे नाव जाहीर केले आहे.

माजी वनमंत्री व काँग्रेस नेते उमंग सिंगहार यांनी भाजपकडून ऑफर आल्याचा दावा केला होता. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष विष्णूदत्त शर्मा यांनी भाजपकडून ऑफर देणाऱ्याचे नाव जाहीर करावे, असे आव्हान सिंगहार यांना दिले होते. हे आव्हान स्वीकारुन सिंगहार यांनी आज जोतिरादित्य शिंदे यांचे नाव जाहीर केले. ते म्हणाले की, मला ऑफर देणाऱ्याचे नाव जाहीर करण्याचे आव्हान शर्मा यांनी दिले होते. मी आता सांगतो की ही ऑफर मला जोतिरादित्य शिंदे यांनी दिली होती. 

जोतिरादित्य शिंदे यांनी मला 50 कोटी रुपयांची ऑफर देऊन भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते. याचबरोबर मंत्रिपद देण्याचे आश्वासनही त्यांनी मला दिले होते, असे सिंगहार यांनी म्हटले आहे. मार्चमध्ये झालेल्या सत्तांतरावेळी भाजपने काँग्रेसच्या आमदारांना प्रत्येकी 35 कोटी रुपये देऊन खरेदी केले, असा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर सिंगहार यांच्या दाव्याने राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

मार्चमधील सत्तानाट्यावेळी काँग्रेसचे आमदार बंगळूरमध्ये होते. त्यावेळी शिंदे यांनी माझ्याशी चर्चा केली होती. त्यांनी मला काँग्रेसमध्ये भवितव्य नसल्याचे म्हटले होते. भाजपमध्ये आल्यास 50 कोटी आणि मंत्रिपद देऊ अशी ऑफरही त्यांनी दिली होती, असे सिंगहार यांनी म्हटले आहे. 

मध्य प्रदेशात 28 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. जोतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत 22 आमदार काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते. त्यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडले होते. आता राज्यात एकूण 28 मतदारसंघात 3 नोव्हेंबरला पोटनिवडणुका होत आहेत. शिंदे यांच्या ग्वाल्हेर व चंबळ या बालेकिल्ल्यात कमलनाथ यांनी काही दिवसांपूर्वी जोरदार शक्तिप्रदर्शनही केले होते. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com