भाजप प्रदेशाध्यक्षांच्या पत्नीला पक्षाच्या नेत्यांनी केलं ट्रोल; ट्विट डिलिट करण्याची वेळ

मध्य प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा यांच्या पत्नी डॉ. स्तुती मिश्रा यांच्या एका ट्विटनं राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे.
भाजप प्रदेशाध्यक्षांच्या पत्नीला पक्षाच्या नेत्यांनी केलं ट्रोल; ट्विट डिलिट करण्याची वेळ
Dr. Stuti MishraSarkarnama

भोपाळ : मध्य प्रदेश भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा यांच्या पत्नी डॉ. स्तुती मिश्रा (Stuti Mishra) यांच्या एका ट्विटनं राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. या ट्विटवरून उलटसुलट प्रतिक्रिया येऊ लागल्याने अखेर त्यांना ट्विट डिलीट करावं लागलं आहे. मिश्रा यांनी मुस्लिम व्यक्तीच्या मेडिकलमध्ये आलेला चांगला अनुभव ट्विट केला होता. पण त्यावरून त्यांनाच ट्रोल करण्यात आलं. त्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचाही समावेश होता.

मध्य प्रदेशसह (Madhya Pradesh) देशभरातील काही राज्यांमधील रामनवमी व हनुमान जयंजीनिमित्त आयोजित मिरवणुकांदरम्यान हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. त्याचे पडसाद देशभर उमटत आहेत. यापार्श्वभूमीवर स्तुती मिश्रा यांनी 16 एप्रिल रोजी आपला एक अनुभव ट्विटरवरून शेअर केला होता. रात्री एका मुस्लिम व्यक्तीच्या मेडिकलमधून औषधे आणल्याबाबत त्यांनी ट्विटरवरून माहिती दिली होती.

Dr. Stuti Mishra
पवारांनी कर्नाटकात पाऊल ठेवताच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवकुमार भेटीला

मिश्रा यांनी म्हटलं होतं की, 'मला रात्री औषधांची गरज होती. पण सगळी दुकानं बंद होती. रात्री साडे अकरा वाजता एका मुस्लिम व्यक्तीचे मेडिकल उघडलं दिसलं. माझ्या गाडीचा चालक आणि मी त्या दुकाना पोहचलो आणि औषधे घेतली. त्यानं म्हटलं की, 'दीदी, या औषधानं जास्त झोप लागते, कमी मात्रा घ्या.' तो खूपच काळजी घेणारा होता. तो मुस्लिम होता. #HinduMuslimUnity', असं मिश्रा यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.

Stuti Mishras deleted Tweet
Stuti Mishras deleted TweetSarkarnama

त्यानतंर दिल्ली भाजपचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी ट्विट केलं की, 'केमिस्टचा धर्म होता, पण दहशतवादाचा धर्म नसतो.' बग्गा यांच्याप्रमाणेच अनेकांनी मिश्रा यांना ट्रोल केलं. त्यामुळे अखेर मिश्रा यांना आपलं ट्विट डिलीट करावं लागलं. त्यावर त्यांनी म्हटलं की, मी आधीचं ट्विट डिलीट केलं आहे. या ट्विटमुळे उगाचच वाद निर्माण होत होता. धार्मिक मुद्दयावर आपले विचार मांडणे अवघड आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता. जय महाकाल', असं मिश्रा यांनी नमूद केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.