MP : विधानसभा निवडणुकीपूर्वी BJP अँक्शन मोडमध्ये ; प्रत्येक बुथवर किमान..

Madhya Pradesh BJP Assembly Elections : राज्यातील ६५ हजार बुथचा यानिमित्ताने आढावा घेण्यात येणार आहे.
ShivrajSingh Chouhan
ShivrajSingh ChouhanSarkarnama

Madhya Pradesh BJP Assembly Elections : मध्यप्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने निवडणूक प्रचार अभियानास सुरुवात केली आहे.

राज्यात १४ मार्च ते २१ मार्च दरम्यान हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात बुथ केंद्रांच्या मजबूतीवर भर देण्यात आला आहे. राज्यातील ६५ हजार बुथचा यानिमित्ताने आढावा घेण्यात येणार आहे.

मध्यप्रदेश भाजपने बुथ कमिटीसाठी ११ सदस्यांची नियुक्ती केली आहे. मतदान बुथ मजबूत करण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. मध्यप्रदेशात भाजपचे १८ हजार बुथ हे कमकुवत असल्याचे आढळले आहे.

या बुथवर भाजपचे विशेष लक्ष असणार आहे. या बुथचे वर्गीकरण करुन येथील मतदारांशी संपर्क साधण्याचे आवाहान भाजप समोर आहे.

ShivrajSingh Chouhan
Shiv Sena : 'मातोश्री' वरील शिवसेना महिला नेत्याचा तो Video Viral ; गुन्हा दाखल

या बुथवरील मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या सूचना कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आगामी निवडणुकीसाठी प्रत्येक बुथवर किमान ५१ टक्के मतदान झाले पाहिजे, असा आदेश भाजप पक्षश्रेष्ठींनी दिला आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष वीडी शर्मा यांनी सांगितले.

प्रत्येक कार्यकर्ता हा मतदारापर्यंत पोहचला पाहिजे. केंद्राच्या सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. त्यांना या योजनांचा लाभ झाला की नाही, याचा आढावा घेण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर आहे, असे शर्मा यांनी सांगितले.

ShivrajSingh Chouhan
Congress : अधिवेशनात निलंबित झालेल्या रजनी पाटलांवर काँग्रेसने दिली मोठी जबाबदारी..

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी अद्याप वर्ष बाकी (२०२४) आहे. या निवडणुकीची भाजपाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. भाजपाने मागील निवडणुकीत पराभव झालेल्या जागांवर जनसंपर्क वाढवण्यासाठी तसेच या जागा काबीज करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे

भाजपने २०१९ मध्ये गमावलेल्या १६० लोकसभा जागा मिळविण्यासाठी मोठी रणनीती आखली आहे. त्यासाठी भाजपने तीन महासचिवांवर मोठी जबादारी सोपवली आहे. या १६० मतदार संघात भाजपकडून विशेष अभियान सुरु करण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com