मुख्यमंत्र्यांना दिल्लीतील निवासस्थान खाली करावं लागणार! लोकसभा सचिवालयाची नोटीस

मुख्यमंत्र्यांना तातडीनं निवासस्थान रिकामं करावं लागणार
MP Flats, AAP News, Bhagwant Mann News in Marathi, AAP News
MP Flats, AAP News, Bhagwant Mann News in Marathi, AAP NewsSarkarnama

चंडीगड : विधानसभा निवडणुकीत पंजाबमध्ये मोठा विजय मिळवून आम आदमी पक्षाने (AAP) सत्ता स्थापन केली आहे. मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी जोरदार कामगिरी सुरू केली आहे. पण आता मान यांना लोकसभा सचिवालयानं दिल्लीतील निवासस्थान खाली करण्याची नोटीस बजावली आहे. त्यांनी बेकायदा पद्धतीने हे निवासस्थान ताब्यात ठेवले, असेही नोटिशीत म्हटले होते. (Bhagwant Mann News in Marathi)

मान हे आधी पंजाबमधील संगरुरचे खासदार होते. त्यांना खासदार म्हणून दिल्लीत हे निवासस्थान मिळालं होतं. ते मार्च महिन्यात पंजाबचे मुख्यमंत्री बनले. यानंतर मान यांनी खासदारकी सोडली होती. त्यामुळं त्यांना दिलेलं हे निवासस्थान 14 एप्रिलला रद्द करण्यात आलं होतं. तेव्हापासून ते मान यांच्या ताब्यात बेकायदा पद्धतीने होतं, असं लोकसभा सचिवालयानं नोटिशीत म्हटलं आहे.

MP Flats, AAP News, Bhagwant Mann News in Marathi, AAP News
पंतप्रधानपद गेल्यानंतर इम्रान खान आक्रमक; मुदतपूर्व निवडणुकांसाठी उतरले रस्त्यावर

सचिवालयाची नोटीस मिळाल्यानंतर मान यांनी तातडीनं हे निवासस्थान खाली करावे. याचबरोबर त्यांचे सामान तेथून हलवावे, असे सचिवालयाने नमूद केले आहे. याबाबत मान यांनी अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, मान यांना वाटप करण्यात आलेलं निवासस्थान आता राजस्थानमधील राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे खासदार हनुमान बेनिवाल यांना देण्यात आलं आहे.

MP Flats, AAP News, Bhagwant Mann News in Marathi, AAP News
उत्तर प्रदेशच नव्हे तर संपूर्ण उत्तर भारतात राज ठाकरेंना नो एंट्री!

दरम्यान, मुख्यमंत्री मान यांनी नुकतीच एका सहकाऱ्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली होती. आरोग्य विभागातील खरेदी व निविदा प्रक्रियेसाठी आरोग्यमंत्री विजय सिंगला एक टक्का कमिशन घेत असल्याच्या तक्रारी होत्या. सिंगला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी सिंगला यांना अटक केली. सिंगला यांना अटक होताच मान यांनी त्यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेतला. सरकार भ्रष्टाचार आजिबात खपवून घेणार नसल्याचा संदेश त्यांनी यातून दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com