Lockdown news : जग पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने; कोरोनामुळे शाळा, कॉलेज, कार्यालये बंद

Lockdown news | कोरोना महामारीतून जग आता कुठे सावरु लागले
Lockdown news
Lockdown news

Lockdown news : कोरोना महामारीतून जग आता कुठे सावरु लागले आहे. विस्कळीत झालेले जनजीवन पुन्हा सुरुळीत सुरु झाले आहे. असे असतानाच आता पुन्हा ज्या चीनमधुन हा व्हायरस जगभरात पसरला त्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरसची (Corona Virus) प्रकरणे झपाट्याने वाढू लागली आहेत. बुधवारी (२४ नोव्हेंबर) चीनमध्ये कोविड रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ नोंदवण्यात आली. यामुळे पुन्हा एकदा जगावर लॉकडाऊनचे संकट घोंगावू लागले आहे.

आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये बुधवारी 31,656 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. चीनमध्ये कोविड-19 च्या प्रकरणांमध्ये एका दिवसात झालेली सर्वाधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ही आकडेवारी एप्रिलच्या मध्यात नोंदवलेल्या 29,390 संसर्गापेक्षा जास्त आहे. एक दिवसापूर्वी चीनमध्ये कोरोनाचे २८ हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले होते.

Lockdown news
Karad : ग्रीन कॉरिडॉरच्या पाचशे एकरवर ॲग्रो इंडस्ट्री पार्क; स्थानिकांना प्राधान्य...

चीनमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. रविवारी सहा महिन्यांनंतर एका वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोना बाधितांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर चीन सरकारने अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन केले आहे. आरोग्य विभागाचे पथक जास्तीत जास्त कोरोना चाचणी आणि क्वारंटाईनवर भर देत आहे.

चीनमध्ये कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता कोविडचे कडक नियम लागू करण्यात आले आहेत. आजपासून राजधानीत सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करण्यापूर्वी ४८ तास आधी निगेटिव्ह पीसीआर कोविड चाचणी अहवाल दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. म्हणजेच लोकांना आता शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, सरकारी कार्यालयात जाण्यासाठी कोविड रिपोर्ट दाखवावा लागेल. यासोबतच लोकांना गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

बीजिंगमध्ये शाळा बंद

चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद करण्यात आल्या आहेत. बीजिंगमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. कोरोनाचा धोका पाहता चीन सरकारने बीजिंगमधील अनेक जिल्ह्यांतील शाळा बंद केल्या आहेत. शासनाने शाळांना ऑनलाईन अभ्यास करण्याचे निर्देश दिले आहेत.

चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊनसारखी परिस्थिती

चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरस वेगाने पसरत आहे. हे पाहता चीन सरकारने कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी अनेक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. बीजिंगसह इतर अनेक भागात कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता सरकारने तेथील शॉपिंग मॉल्स आणि रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय काही उद्याने आणि जिमही बंद करण्यात आली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com