Local Body Election : जागा महिलेसाठी आरक्षित होताच पठ्ठ्यानं लावलं लग्न अन् नवविवाहिता झाली नगराध्यक्ष!

Local Body Election : अर्ज भरायला दोन दिवस शिल्लक असताना केलं लग्न...
UP Local Body Election :
UP Local Body Election :Sarkarnama

Local Body Election Uttar Pradesh : उत्तरप्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठा उलटफेर घडून आला. समाजवादी पक्षाचे दिग्गज नेते आझम खान यांचे रामपूर नगरपालिकेवरील मागील काही दशकांपासून असलेले वर्चस्व संपुष्टात आले आहे. रामपूरच्या नगरपालिकेच्या अध्यक्षपदी सना खान यांनी 10 हजार 958 मतांनी विजय मिळवून सर्वांना चकित केले. विशेष म्हणजे सना खानने अध्यक्षपद मिळवण्यासाठी घाईघाईने केलेल्या लग्नामुळे चर्चेत आली होती. (Sana Khan News)

45 वर्षीय नेता ममून शाह खानने अवघ्या 45 तासात सना खानसोबत नातं जोडत लग्न केलं. खरंतर या पालिकेच्या निवडणुकीसाठी 17 एप्रिल ही निवडणूकसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती. 15 एप्रिल रोजी ममून शाह खान आणि सना खानचे लग्न झाले.

UP Local Body Election :
Mahavikas Aghadi News: महाविकास आघाडीने पुन्हा 'वज्रमूठ' आवळली; थांबलेल्या सभा पुन्हा होणार!

काय आहे पूर्ण कहाणी?

रामपूरचे स्थानिक नेते मामून शाह खान यांनी नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली होती. मात्र या जागेवर आरक्षण यादी जाहीर झाली आणि त्यांच्या राजकीय प्रवासाला खीळ बसणार होती. कारण रामपूर नगराध्यक्षपद महिलेसाठी आरक्षित झाले होते. मामून शाह खानने यातून एक अनोखा मार्ग शोधून काढला. अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करायच्या दोन दिवस आधी म्हणजे १५ एप्रिल रोजी मामून शाह आणि सना खानने लग्न केले.

पाच वर्ष वाट पाहावी लागली असती :

ममून शाह खान म्हणाले की, रामपूर नगरपालिकेचे अध्यक्षपद महिलांसाठी राखीव असल्याने निवडणुकीसाठी ५ वर्षे वाट पाहावी लागली असती.पण लोकांमध्ये लोकांसाठी काम करायचं होतं, म्हणून लग्न करायचं ठरवलं. आणि अध्यक्षपद आता घरातच आणलं.

तर यात दुसरी विशेष गोष्ट अशी की, काँग्रेसने ममून शाह यांना तिकीट देण्यास नकार दिल्याने, त्यांनी पत्नी सना यांच्यासह आम आदमी पक्षात प्रवेश केला. त्यानंतर 'आप'च्या तिकिटावर नवविवाहितीने निवडणूक लढवून विजय मिळवला. नगरपालिकेच्या अध्यक्षा झाल्या.

UP Local Body Election :
Karnataka Election Result : भाजपच्या निम्म्या मंत्र्यांना मतदारांनी दाखवला घरचा रस्ता!

पालिका निवडणुकीच्या निकालात आम आदमी पक्षाच्या (आप) उमेदवार सना खानम यांना 43 हजार 131 मते मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकावर सत्ताधारी भाजपचे मुसरत मुजीब होते, त्यांना 32 हजार 173 मते मिळाली. समाजवादी पक्षाच्या फातिमा जबी 16 हजार 273 मते मिळवून तिसऱ्या स्थानावर आहेत.

UP Local Body Election :
Karnataka Election Result : किंगमेकर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या JDS ला 'अशी' लागली उतरती कळा?

नवविवाहितेने रचला इतिहास :

45 वर्षीय मामून खान शाह यांच्या पत्नी सना खानने सपाचे नेते आझम खान यांचा बालेकिल्ला रामपूर नगरपालिका जिंकून इतिहास रचला आहे. 31 वर्षीय सना खानसाठी उत्तर प्रदेशमधील ही जिंकणे मोठे आव्हान होते. 15 एप्रिल ते 13 मे दरम्यान सनाने लग्न केले आणि राजकारणातही प्रवेश केला. आम आदमी पक्षाचे तिकीट मिळवले. उमेदवारी दाखल केली, प्रचार केला आणि महापालिका निवडणुकीतही विजय मिळवला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in