ljp president chirag paswan thanks narendra modi for remembering ram vilas paswan
ljp president chirag paswan thanks narendra modi for remembering ram vilas paswan

पंतप्रधान मोदींच्या भाषणाने चिराग पासवान झाले भावुक

बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीहे आता बिहारच्या प्रचारात थेट उतरले आहेत.

नवी दिल्ली : बिहारमध्ये प्रचाराला आता जोर चढला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट प्रचारात उडी घेतली आहे. मोदींना आज जाहीर सभेत बोलताना बिहारच्या दोन पुत्रांच्या आठवणी जागवून जनभावनेला हात घातला. यात पंतप्रधानांचे दिवंगत सहकारी रामविलास पासवान आणि बाबू रघुवंशसिंह प्रसाद यांचा समावेश होता. मोदी यांच्या भाषणानंतर भावुक झालेल्या चिराग यांनी ट्विटरवर भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. 

मुख्यमंत्री नितीशकुमार यांना विरोध करीत बिहारमधील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) बाहेर पडला आहे. याचवेळी देश पातळीवर भाजपला पाठिंबा कायम राहील, अशी भूमिका एलजेपीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी घेतली आहे. चिराग यांनी हे नितीशकुमार यांना लक्ष्य करीत आहेत. तरुणांच्या हाती सूत्रे मिळावीत अशी भूमिका घेतली त्यांनी आहे. यामुळे ज्येष्ठ विरुद्ध तरुण असा वाद बिहारमध्ये सुरू झाला आहे. 

मोदींना आज बिहारमधील प्रचारात उडी घेतली. त्यांनी आज सासाराम, गया आणि भागलपूर येथे जाहीर सभा घेतल्या. या वेळी त्यांनी राज्यातील एनडीए सरकारचे कौतुक केले. मोदींनी काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाला लक्ष्य केले. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहार विकासाच्या मार्गावर वाटचाल करीत आहेत, असा दावा मोदींनी केला. 

मोदींनी आज भाषणात बिहारच्या दोन पुत्रांचा उल्लेख केला. यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मोदी म्हणाले की, बिहारने नुकतेच दोन पुत्र गमावले आहेत. मी रामविलास पासवान यांना आदरांजली अर्पण करतो. ते शेवटच्या श्वासापर्यंत माझ्यासोबत होते. त्यांनी संपूर्ण आयुष्य गरीब आणि दलितांच्या कल्याणासाठी वाहिले. याचप्रकारे बाबू रघुवंशप्रसादसिंह यांनी गरीबांसाठी काम केले. मी त्यांनाही आदरांजली वाहतो. 

मोदींच्या भाषणानंतर चिराग पासवान हे भावुक झाले. त्यांनी ट्विटरवर भावनांना वाट मोकळी करुन दिली. ते म्हणाले की, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये येतात आणि पप्पांना एका खऱ्या साथीप्रमाणे श्रद्धांजली देतात. पप्पांसोबत शेवटच्या श्वासांपर्यंत होते, असे त्यांनी म्हटले असून, यामुळे मी भावुक झालो आहे. एक मुलगा म्हणून पप्पांबद्दल पंतप्रधानांचा हा स्नेह आणि सन्मान पाहून  मला खूप चांगले वाटले. पंतप्रधानांचे धन्यवाद! 

मोदींना आज पासवान यांचा उल्लेख केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. चिराग पासवान हे एनडीएमधून बाहेर पडले असले तरी ते मोदींचे गुणगाण गाताना थकत नसल्याचे चित्र आहे. याचवेळी मोदींनीही चिराग यांचे पिता रामविलास पासवान यांच्या आठवणी जागवल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. पासवान यांच्या निधनानंतर जनतेत असलेल्या सहानुभूतीच्या लाटेचा फायदा व्हावा, असा उद्देश यामागे असल्याची चर्चा आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com