Manish Sisodia News: मद्य घोटाळ्याला 'मनी लॉन्ड्रिंग'ची किनार; सिसोदियांच्या चौकशीसाठी 'ईडी' थेट 'तिहार'मध्ये

ED at Tihar Jail : ईडीकडून आतापर्यंत ११ जणांना अटक; सिसोदियांच्या अडचणीत वाढ
Manish Sisodia
Manish SisodiaSarkarnama

Delhi News: दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया यांना दिल्लीतील दारू धोरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने अटक केली आहे. आता या घोटाळ्याला 'मनी लॉन्ड्रिंग'ची किनार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) आतापर्यंत ११ जणांना अटक केली आहे. या प्रकरणी सिसोदियांची चौकशी करण्यासाठी 'ईडी'ने थेट तिहार तुरुंग गाठले. दरम्यान 'सीबीआय'ने सिसोदियांचे स्वीय सचिव देवेंद्र शर्मा यांचीही चौकशी केली आहे.

मद्य धोरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी 'सीबीआय'ने मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना २६ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. यानंतर त्यांना सात दिवसांची 'सीबीआय' (CBI) कोठडी सुनावली होती. सीबीआयने सिसोदिया यांना सोमवारी 'राऊस एव्हेन्यू कोर्टा'त हजर केले. 'सीबीआय'ने सिसोदिया यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याची मागणी केली होती. न्यायालयाने सिसोदिया यांना २० मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

Manish Sisodia
Patan : मंत्री देसाईंची कार्यकर्त्याप्रती तळमळ; रात्री आठ वाजता ताफा गावात पोहोचला...

मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना सोमवारी तिहार तुरुंगात हलविण्यात आले आहे. त्यानंतर मंगळवारी 'मनी लॉन्ड्रिंग'प्रकरणी सिसोदिया यांचे म्हणणे नोंदविण्यासाठी 'ईडी'ची टीम तिहार तुरुंगात पोहोचली. दरम्यान 'ईडी'ने (ED) कोर्टात अर्ज करून मनीष सिसोदिया यांची तिहारमध्ये चौकशी करण्याची परवानगी मागितली होती. सिसोदिया यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी न्यायालयाने 'ईडी'ला तीन दिवसांची मुदत दिली आहे.

दरम्यान 'सीबीआय'ने २६ फेब्रुवारी रोजी मनीष सिसोदिया यांना अटक केलेली आहे. दिल्ली सरकारच्या (Delhi) वादग्रस्त मद्य धोरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई केली आहे. सीबीआयने सिसोदिया यांच्यावर तब्बल सहा महिन्यांच्या तपासानंतर ही कारवाई केली आहे. दिल्लीत १७ नोव्हेंबर २०२१ रोजी केजरीवाल सरकारने नवीन उत्पादन शुल्क धोरण लागू केले. दिल्ली सरकारने नवीन उत्पादन शुल्क धोरण आणून माफिया राजवट संपवण्याचा युक्तिवाद केला होता. यामुळे सरकारच्या महसुलात वाढ होईल, असा दावाही करण्यात आला.

Manish Sisodia
Pune News : कसब्याच्या विजयाने रमेश बागवेंच्या आशा पल्लवित; कँटोन्मेंट मधील गणित बदलणार...

जुलै २०२२ मध्ये दिल्लीच्या तत्कालीन मुख्य सचिवांनी या प्रकरणी अहवाल सादर केला होता. यामध्ये उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्यावर अबकारी धोरणात अडथळे आणणे, दारू व्यावसायिकांना अवाजवी फायदा दिल्याचा आरोप करण्यात आले होते. या अहवालाच्या आधारे 'सीबीआय'ने १७ ऑगस्ट २०२२ रोजी सिसोदिया यांच्यासह १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. २२ ऑगस्ट रोजी 'ईडी'ने अबकारी धोरणात 'मनी लॉन्ड्रिंग'चा गुन्हा नोंदविलेला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com