Karnatak Assembly Election 2023 : विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट; सर्वच पक्षांसमोर बंडखोरीचे आव्हान

Karnatak Assembly Election 2023 | गेल्यावेळी कर्नाटकमध्ये भाजपकडून ‘आॅपरेशन कमळ'द्वारे सत्ता हस्तगत करण्यात आली होती.
Karnatak Assembly Election 2023
Karnatak Assembly Election 2023Sarkarnama

Karnatak Assembly Election 2023 : दर पाच वर्षांनी सत्ता बदलाची अहमहमिका असलेल्या कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीची दक्षिणेतील ही ‘सेमीफायनल' असल्याचे मानले जात असल्याने या निवडणुकीस मोठे महत्त्व आले आहे. गेल्यावेळी कर्नाटकमध्ये भाजपकडून ‘आॅपरेशन कमळ'द्वारे सत्ता हस्तगत करण्यात आली होती. हिजाब, मुस्लिमांचे आरक्षण, गैरव्यवहार व गैरकारभार अशी वेगवेगळी आव्हाने असलेल्या भाजपसमोर लिंगायत समाजाच्या बंडखोरीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. या निवडणुकीच्या रंगतीचे चित्र आज स्पष्ट झाले. (Lingayat community's rebellion challenge to BJP in Karnataka assembly elections)

काँग्रेसला मोठी संधी असली तरी केंद्रीय नेतृत्वाची कमतरता आणि प्रचारासाठी नसलेला स्थानिक पातळीवरील मुद्दा या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यात नेतेपदासाठी रस्सीखेच होणार हे निश्‍चित! अकार्यक्षम आणि गैरव्यवहाराच्या आरोपावरून मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागलेल्या बी. एस. येडीयुरप्पा यांना भाजपला पुन्हा केंद्रस्थानी आणून ठेवावे लागले आहे. लिंगायत व्होट बँकेस नजरेसमोर ठेवून हे पाऊल उचलावे लागले आहे. मुलगा बी. वाय. विजयेंद्र (शिकारीपूर) यांना उमेदवारी मिळाल्यानंतर मात्र येडीयुरप्पा राजकारणात भाजपकडून सक्रिय झाले आहेत. (National Political news)

Karnatak Assembly Election 2023
Market Committee Election : मार्केड यार्ड नसूनही मावळात भाजप, राष्ट्रवादीत कलगीतुरा

लिंगायत व वक्कलिंग या दोन समाजाचे कर्नाटकात प्राबल्य आहे. त्यातील लिंगायत समाज भाजपकडे तर वक्कलिंग समाज धर्मनिरपेक्ष जनता दलाकडे आकर्षित आहे. भाजपने उमेदवारी नाकारल्याने तब्बल सहावेळा विजयी झालेले भाजपचे कट्टर हिंदूत्ववादी नेते व माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर (हुबळी) तसेच माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी (अथणी) यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. भाजपची ज्या लिंगायत समाजावर मदार होती, त्या समाजाचे म्‍हणजे कर्नाटक वीरशैव संघाचे अध्यक्ष शामनूर शिवशंकरप्पा (वय ९२) यांना काँग्रेसने दक्षिण दावणगिरीतून उमेदवारी दिली आहे.

शेट्टर यांच्या विरोधात लिंगायत समाजाचे महेश टेंगीनकाई यांना भाजपने विचारपूर्वक उमेदवारी दिली आहे. तर धर्मनिरपेक्ष जनता दलाने यादगिरी मतदारसंघातून माजीमंत्री ए. बी. मलकरेड्डी (वय ८१) यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेस व भाजपचे काही बंडखोर धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या हाती लागले आहेत. धर्मनिरपेक्ष जनता दलाचा बालेकिल्ला असलेल्या म्हैसूर, मंड्या, हसन, कोलार या भागात माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या प्रभावाचीही यंदा कसोटी लागेल. (Karnatak Election 2023)

Karnatak Assembly Election 2023
Nandgaon APMC election : समीर भुजबळ आमदार सुहास कांदे यांची कोंडी करतील?

धजदच्या विजयी संख्येवर कर्नाटकच्या सत्तासुंदरीचा सोपान कोण सर करेल याच्या औत्सुक्य कायम असेल.कर्नाटकातील उमेदवारात संपत्तीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेले काँग्रेसचे डी. के. शिवकुमार यांची माजी गृहमंत्री आर. अशोक (कनकपूर) तसेच सिद्धरामय्या (काँग्रेस) यांच्या विरोधात मंत्री व्ही. सोमन्ना (भाजप) यांच्यातील लढती रंगणार आहेत. शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांच्या नावाची शिफारस करून बॉम्बच टाकला आहे. (Karnatak Election 2023)

मोदी-योगी फॅक्टरवर मदार

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सध्यातरी ‘अच्छे दिन' असल्याचे सर्व्हेमधून जाणवत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तब्बल २६ सभांचे तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दहा-बारा सभांचे नियोजन करण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आठ दिवस ठाण मांडून बसणार आहेत. मोदी-योगींच्या सभांच्या प्रभावाचा करिष्माच भाजपला तारणार असल्याची चर्चा आहे.

पारंपरिक लढती

गेल्यावेळी अत्यंत अटीतटीच्या लढतीत बाजी मारलेल्या काँग्रेसच्या व महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील (गदग) यांच्याविरोधात पुन्हा अनिल मेणसिनकाई (भाजप) रिंगणात उतरले आहेत. केवळ १५०० मतांनी पाटील गेल्यावेळी विजयी झाले होते. आळंद मतदारसंघातून सुभाष गुत्तेदार (भाजप) व बी. आर. पाटील (काँग्रेस) तसेच अफझलपूर मतदारसंघात मलिकय्या गुत्तेदार (भाजप) व एम. वाय. पाटील (काँग्रेस) यांच्यातील पारंपरिक लढत लक्षणीय ठरेल.

Karnatak Assembly Election 2023
Rajaram Sugar Factory Election result: विरोधकांचा कंडका पडला; महादेवराव महाडिकांनी गुलाल उधळला

लक्ष्यवेधी

- काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची प्रतिष्ठा पणाला

- मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची कसोटी

- भाजपकडून ७१ नव्या चेहऱ्यांना संधी

- वयाच्या अटीमुळे अनेक ज्येष्ठांचे पत्ते कट

- जी. एस. तिप्पारेड्डी (चित्रदुर्ग) व गोविंद करजोळ (मुधोळ) या ज्येष्ठांना पुन्हा संधी

- भाजपकडून २९ विद्यमान आमदारांची उमेदवारी कट

- गुरुराज घंटीगोळी (पैंदूर) व भारती मुरुळे (सुळ्य) हे अत्यंत गरीब उमेदवार भाजपकडून रिंगणात

- कर्नाटकात काँग्रेसला पूरक वातावरण

- ‘अँटी इन्कम्बन्सी़'चा होईल लाभ

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com