Narendra Modi, Amit Shah, Arvind Kejriwal Latest News
Narendra Modi, Amit Shah, Arvind Kejriwal Latest Newssarkarnama

पंजाबप्रमाणे गुजरातमध्ये देखील केजरीवालांचं भाकीत खरं ठरणार का?, कागदावर दिलं 'हे' लिहून

Gujrat Election : केजरीवाल यांनी पंजाब निवडणुकीबद्दल केलेलं भाकीत तंतोतंत खरं ठरलं होतं...

Arvind Kejriwal : गुजरात निवडणुकीसंदर्भात आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब निवडणुकीत केलेल्या भाकीताप्रमाणेच गुजरात निवडणुकीच देखील भाकीत केलं आहे.

त्यांनी पंजाबप्रमाणेच गुजरातमध्ये देखील आम आदमी पक्षाची सत्ता येणार असल्याचा दावा केला असून हे चक्क कागदावर लिहून दिले आहे. गुजरातमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Narendra Modi, Amit Shah, Arvind Kejriwal Latest News)

Narendra Modi, Amit Shah, Arvind Kejriwal Latest News
उदयनराजे भावूक; 'शिवाजी महाराजांचा असा अपमान होत असेल तर मी मेलो असतो ते परवडलं असतं'

केजरीवाल म्हणाले, गेल्या 27 वर्षे सत्तेत असलेल्या भाजपला या निवडणुकीत मोठा झटका बसणार असून येथे सत्ताबद्दल होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर तसे त्यांनी पत्रकार परिषदेत लिहून देखील दिले आहे.

ते पुढे बोलतांना म्हणाले की, रस्त्यावर कुणालाही विचारले तर तो म्हणले की आम आदमी पक्षालाच मतदान करणार. त्यामुळे भाजपमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच गुजरात हे पहिले राज्य आहे की, जिथे सामान्य माणूस मतदानाबाबत बोलायला घाबरतोय. त्याला भाजपचे लोक मारतील असे वाटते, असा गंभीर आरोप देखील केजरीवालांनी भाजपवर केला आहे. तसेच, गुजरातमध्ये आपच्या 92 च्या वर जागा निवडूण येतील असा छीतीठोक दावा देखील केला आहे. त्यामुळे गुजरात निवडणुकीबद्दल उत्सुकता वाढली आहे.

Narendra Modi, Amit Shah, Arvind Kejriwal Latest News
MNS : बाबा रामदेव विरोधात पतंजली स्टोअरसमोर मनसेची घोषणाबाजी...

केजरीवाल (Arvind Kejriwal) पुढे बोलतांना म्हणाले की, गुजरातमध्ये (Gujrat) काँग्रेसचा मतदार शोधूनही सापडत नाही,असा काँग्रेसला चिमटा काढत ते म्हणाले की, यावेळी भाजपची मोठी व्होट बँक देखील 'आप'ला (AAP) मत देईल. माझे राजकीय भाकीत खरे ठरणार असून केजरीवालांनी भर पत्रकार परिषदेत कागदावर असे लिहून दिले आहे. तर असाच दावा आपण पंजाब निवडणुकीवेळी देखील केला होता आणि तो तंतोतंत खरा ठरला होतं आणि पंजाबमध्ये कॅाग्रेसचा सुपजा साफ झाला आणि 'आप'ने एकहाती सत्ता आली होती.

विशेष म्हणजे केजरीवाल यांनी यासंदर्भात आधीच भाकीत केलं होतं आणि ते खरं होईल, असे कुणालाही वाटलं मात्र तसे घडलं होतं त्यामुळे गुजरात निवडणुकीसंदर्भात त्यांनी केलेल्या भाकीतामुळे भाजपचं टेन्शन मात्र वाढवणार आहे. 

दरम्यान, यावेळी केजरीवाल यांनी आमचे सरकार स्थापन झाल्यास 31 जानेवारीपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी अधिसूचना जारी केली जाईल.मी हवेत बोलत नाही,आम्ही पंजाबमध्ये ओपीएस लागू केला आहे. तसेच येथे देखील होणार असल्याचे अश्वासन दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in