मुदतपूर्व निवडणूक घ्या! काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

लोकांची सेवा कशी करायची, हे त्यांना माहित नाही. लोक अडचणीत असून मरतअसताना सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे.
Lets go for polls to give a new administration says D K Shivkumar
Lets go for polls to give a new administration says D K Shivkumar

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांना पदावरुन हटवण्यासाठी पक्ष नेतृत्वाने हालचाली सुरू केल्याची चर्चा आहे. या चर्चेत आता काँग्रेसनंही उडी घेतली आहे. कर्नाटकातील पुर परिस्थिती हाताळण्यात सरकारला अपयश आल्याचे कारण देत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना थेट निवडणुकीला सामोरं जाण्याचं आव्हान दिलं आहे. (Lets go for polls to give a new administration says D K Shivkumar)

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, राज्य चालवण्यात भाजप सरकार अपयशी ठरलं आहे. लोकांची सेवा कशी करायची, हे त्यांना माहित नाही. लोक अडचणीत असून मरत आहे, आपली संपत्ती गमावून बसत असताना सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळं सरकारनं निवडणुकीला सामोरं जात राज्याला नवीन प्रशासन द्यावे. लोकांच्या समोर जातं त्यांनाच निर्णय घेऊद्या, अशा शब्दांत शिवकुमार यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं आहे. 

हेही वाचा : दिल्लीतून फॅक्स आला अन् दौरा ठरवत मातोश्रीचा दरवाजा उघडला
 
दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे दोन दिवसांपासून गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांना कर्नाटकमधील राजकीय पेचाविषयी प्रश्न विचारण्यात आला. येडियुरप्पा यांच्याविषयी बोलताना नड्डा म्हणाले, कर्नाटक भाजपमध्ये कोणताही वाद नाही. येडियुरप्पा चांगलं काम करत आहेत. येडियुरप्पा हे कर्नाटकची त्यांच्या पध्दतीने चांगली काळजी घेत आहेत. तिथे वाद असल्याचे तुम्हाला वाटत आहे. आम्हाला तसं वाटत नाही, असं नड्डा यांनी स्पष्ट केलं. 

काही तासांपूर्वीच युडियुरप्पा यांनीही नेतृत्वबदलाबाबत वक्तव्य केलं होतं. त्यानंतर तासाभरातच नड्डा यांचे हे वक्तव्य आलं आहे. 'सायंकाळपर्यंत पक्षश्रेष्ठींकडून आदेश आल्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल,' असे येडियुरप्पा बेळगावी येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते. येडियुरप्पांच्या राजीनाम्याची चर्चेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. येडियुरप्पांच्या विरोधात त्यांच्या सहकाऱ्यांनी उघड बंड पुकारले आहे. येडियुरप्पांचे पुत्र विजयेंद्र हे 'सुपरसीएम' असल्याची टीका मंत्रिमंडळातील सहकारी करीत आहेत. शनिवारी विजयेंद्र यांनी नड्डा यांची दिल्लीत भेट घेतली होती. यामुळे येडियुरप्पांचे उत्तराधिकारी विजयेंद्र ठरतील, या  मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेने जोर पकडला आहे. 

दरम्यान, भाजपची विधिमंडळ बैठक 25 जुलैला होणार असून, यात येडियुरप्पांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. येडियुरप्पांच्या राजीनाम्याबाबत तर्कवितर्क लढवले जाऊ लागले होते. त्यामुळे त्यांनी अखेर मौन सोडले होते. ते म्हणाले होते की, मला पक्षाचे केंद्रीय नेतृत्व 25 जुलैला जो आदेश देईल, त्याचे पालन मी करेन. मी माझे काम 26 जुलैपासून सुरू करेन. राज्यातील भाजप सरकारला 2 वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त 26 जुलैला कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर पक्षश्रेष्ठी देतील त्या आदेशाचे मी पालन करेन. 

येडियुरप्पांना हे राज्यातील लिंगायत समाजाचे मोठे नेते आहेत. येडियुरप्पांना राजीनामा देण्यास भाग पाडू नये यासाठी राज्यातील लिंगायत मठांच्या प्रमुखांनी केंद्रातील भाजप नेतृत्वाला उघड इशारा दिला होता. याचबरोबर लिंगायत समाजाच्या काँग्रेस आमदारांनाही भाजपला इशारा दिला होता. यामुळे येडियुरप्पांच्या जागी लिंगायत नेताच मुख्यमंत्री बनावा, असा आग्रह विजयेंद्र यांनी पक्ष नेतृत्वाकडे धरला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही हीच भूमिका घेतली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com