महत्त्वाकांक्षेसाठी विचारसरणी सोडली; काँग्रेसची ज्योतिरादित्य शिंदेंवर टीका 
ashok-ghealot-jayramesh, jyotiraditya shinde, kirti azad,

महत्त्वाकांक्षेसाठी विचारसरणी सोडली; काँग्रेसची ज्योतिरादित्य शिंदेंवर टीका 

ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, काँग्रेसचे नेते अधीनरंजन चौधरी, काँग्रेसचे नेते किर्ती चिदंबरम, ज्येष्ठ नेते जयराम रमेशयांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

नवी दिल्ली : ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासारखा बडा नेता भाजपच्या गोटात गेल्याचा धक्का काँग्रेसला अद्याप पचला नसून अनेक काँग्रेस नेत्यांनी आजही त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

ज्योतिरादित्य यांनी वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपोटी विचारसरणीला दूर केले, अशी टीका बहुतांशी काँग्रेस नेत्यांनी केली आहे. काही नेत्यांनी या पक्षांतराची तुलना १८५७ च्या
उठावावेळी शिंदे घराण्याची भूमिका आणि १९६७ मध्ये राजमाता विजयाराजे शिंदे यांनी काँग्रेसला दिलेली सोडचिठ्ठी या घटनांबरोबर करत ज्योतिरादित्य यांना गद्दार ठरविण्याचाही प्रयत्न केला आहे. 

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले, `ज्योतिरादित्य यांनी जनतेच्या विश्‍वासाला तडा दिला आहे. त्यांच्यासारखे लोक सत्तेशिवाय जगू शकत नाहीत. देशात आणीबाणीसारखी परिस्थिती असताना त्यांचे असे वागणे हे आत्मकेंद्री राजकारणाचे उदाहरण आहे.`

काँग्रेसचे लोकसभेती नेते अधीनरंजन चौधरी टीका करताना म्हणाले, ``ज्योतिरादित्य यांना विचारसरणीशी काही देणेघेणे नाही. भाजपने त्यांना राजकीय लालुच दाखवीत आपल्या जाळ्यात अडकविले आहे. काँग्रेसने ज्योतिरादित्य यांच्यावर इतके वर्षे विश्‍वास दाखविला, त्यांना जबाबदारीची पदे दिली होती. `` काँग्रेसचे किर्ती चिदंबरम म्हणाले की, महत्त्वाकांक्षा मी समजू शकतो. पण विचारसरणीचे काय? 

माधवराव शिंदे एकदा भाजपला देशद्रोह्यांचा पक्ष म्हणाले होते. आता त्यांचाच मुलगा त्या टोळीत सहभागी झाल्यावर त्यांना काय वाटत असेल? असा सवाल काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी उपस्थित केला. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in