'ना खाऊंगा, ना खाने दूंगा,' असं म्हणणाऱ्या मोदींना खाणारा भाजप प्रदेशाध्यक्ष दिसत नाही!

केरळचे भाजप प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर दहा दिवसांत दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.
left and congress targets narendra modi over kerala bjp president k surendran
left and congress targets narendra modi over kerala bjp president k surendran

तिरूअनंतपुरम : केरळ (Kerala) विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) बहुमत मिळवून पुन्हा डाव्यांची सत्ता आली. परंतु, भाजपला (BJP) राज्यात खातेही खोलता आले नव्हते. भाजपची राज्यात असलेली एकमेव जागाही पक्षाने गमावली. यातच आता केरळचे भाजप प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन (K.Surendran) अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर दहा दिवसांत दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. यावरुन डाव्यांसह काँग्रेसने भाजपची कोंडी केली आहे. 

या प्रकरणी काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉ. शमा महमूद यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी आता सुरेंद्रन यांना प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यास का सांगत नाही, हा खरा प्रश्न आहे. मोदींनी 2014 मध्ये ना खाऊँगा, ना खाने दूँगा, अशी घोषणा केली होती. परंतु, प्रत्यक्षात उलट वर्तन त्यांच्या पक्षाकडून सुरू आहे. खाणारा प्रदेशाध्यक्ष भाजपला कसा चालतो? 

या विषयी बोलताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य चिटणीस ए.विजयराघवन म्हणाले की, भाजपची केंद्रात सत्ता आहे. भाजपने लोकशाही मूल्यांचे जतन करायला हवे. दुर्दैवाने भाजपकडूनच ही मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत. केरळच्या जनतेसमोर दिवसाढवळ्या ते गैरप्रकार करताना सापडले आहेत. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुरेंद्रन यांच्याविरोधात आता दहा दिवसांत दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. विधानसभा निवडणुकीवेळी भाजपप्रणित आघाडीत परतण्यासाठी एका आदिवासी नेत्याला पैसे दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. मुस्लिम स्टुडंट्स फेडरेशनचे नेते पी.के.नावस यांच्या तक्रारीनंतर स्थानिक न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. एका ऑडिओ क्लिपच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीत भाजपने पैसे वाटल्याप्रकरणी सुरेंद्रन यांची चौकशी विशेष पथकाद्वारे करण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीवेळी आदिवासी नेते सी. के. जानू यांच्या पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) साथ द्यावी, यासाठी त्यांना पैसे पुरविल्याचा आरोप सुरेंद्रन यांनी फेटाळला होते. जानू यांना पैशाचे आमिष दाखविले नाही अथवा त्यांना पैसे दिलेले नाहीत. भाजपची प्रतिमा मलिन करण्यासाठी असे आरोप होत असून, या प्रकरणाच्या चौकशीसाठी भाजप पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करेल, असा दावा सुरेंद्रन यांनी केला होता.

सुरेंद्रन यांच्यावर आधी प्रतिस्पर्धी उमेदवारीला माघार घेण्यासाठी पैसे दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मांजेश्वरम मतदारसंघातून सुरेंद्रन उभे होते. त्यांनी मायावतींच्या बहुजन समाज पक्षाचे उमेदवार के.सुंदरा यांनी माघार घ्यावी, यासाठी 2.5 लाख रुपये दिले होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com