कंगनाच्या विरोधात खटला अन् त्यात थेट पंतप्रधान मोदींचे नाव!

भारताच्या स्वातंत्र्य लढ्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करुन अभिनेत्री कंगना राणावत अडचणीत आली आहे.
NarendraModi and Kangana Ranaut
NarendraModi and Kangana RanautSarkarnama

नवी दिल्ली : भारताला (India) 1947 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य (Independence) हे भीक म्हणून मिळाले होते, खरे स्वातंत्र्य तर 2014 मध्येच मिळाले, या वक्तव्यावरुन अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) वादात सापडली आहे. आता तिच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. तिच्या विरोधात आग्र्यात एका वकिलाने खटला दाखल केला असून, यात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही (Narendra Modi) ओढले आहे.

आग्र्यातील वकील रमाशंकर शर्मा यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल केली आहे. कंगनाने स्वातंत्र्य लढ्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून त्यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर 15 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे यात त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही नाव टाकले आहे. केंद्र सरकारने कंगनावर कोणतीही कारवाई न केल्याने त्यांनी मोदींना यात ओढले आहे.

याचबरोबर भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचेही नाव या याचिकेत आहे. ठाकूर या समझोता बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आहेत. त्या सध्या जामिनावर बाहेर आहेत. त्यांनीही महात्मा गांधींचा अवमान केल्याचा दावा शर्मा यांनी केला आहे. शर्मा हे राजीव गांधी बार असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या या याचिकेच्या सुनावणीकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

NarendraModi and Kangana Ranaut
काँग्रेसची स्टारपॉवर वाढली; पक्षाला मिळाला आणखी एक सिद्धू!

दरम्यान, सोशल मीडियावर कंगनाला प्रतिबंध घालावा, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयातही करण्यात आली आहे. यासाठी केंद्रीय गृह मंत्रालय, माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) आणि विविध राज्यांची पोलीस दले यांना यासाठी निर्देश द्यावेत, असेही याचिकेत म्हटले आहे. सरदार चरणजितसिंह चंदरपाल यांनी ही याचिका दाखल केली आहे. देशातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी कंगनाच्या सोशल मीडिया पोस्टवर निर्बंध घालावेत, असेही त्यांनी याचिकेत म्हटले आहे.

NarendraModi and Kangana Ranaut
सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर सरकारकडून तातडीनं चार जिल्ह्यांतील शाळा बंद

कंगनाने शेतकऱ्यांना खलिस्तानी दहशतवादी म्हटल्याप्रकरणी विविध ठिकाणी दाखल झालेले एफआयआर मुंबईतील खार पोलीस ठाण्यात वर्ग करावेत. या प्रकरणी 6 महिन्यांत आरोपपत्र दाखल करावे आणि खटल्याची सुनावणी 2 वर्षांत पूर्ण करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. कंगनाकडून भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग सुरू आहे, असा दावाही सर्वोच्च न्यायालयातील याचिकेत करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com