बिपिन रावत यांचे बंधू निवडणुकीच्या मैदानात? घेतला मोठा निर्णय

देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे बिगूल वाजले असून सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावला आहे.
CM Pushkar Singh Dhami, Vijay Rawat
CM Pushkar Singh Dhami, Vijay RawatSarkarnama

नवी दिल्ली : सरसेनाध्यक्ष (CDS) जनरल बिपिन रावत (Bipin Rawat) यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. त्यानंतर काही दिवसांतच त्यांचे छोटे बंधू कर्नल (निवृत्त) विजय रावत (Vijay Rawat) यांनी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तोंडावर मोठा निर्णय घेतला आहे. विजय रावत यांनी बुधवारी भाजपमध्ये (BJP) प्रवेश करत निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे संकेत दिले आहेत.

उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) पुढील महिन्यात 14 तारखेला विधानसभेचे मतदान आहे. तर 10 तारखेला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत भाजपसह काँग्रेसने जोर लावला आहे. यापार्श्वभूमीवर भाजपकडून विजय रावत यांना तिकीट दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रावत यांनी बुधवारी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांची दिल्लीत भेट घेत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

CM Pushkar Singh Dhami, Vijay Rawat
रोहितच्या बहिणीनं सांगितलं पहिल्या विजयामागचं गुपित; म्हणाली, आबांची...!

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रावत म्हणाले, मी भाजपसाठी काम करू इच्छित आहे. आमच्या कुटुंबाची विचारधारा भाजपशी मिळतीजुळती आहे. जर भाजपने सांगितले तर मी निवडणूक लढवीन. मला मुख्यमंत्री धामी यांची राज्यासाठीचा दृष्टीकोन आवडतो. माझ्या भावाच्या मनामध्ये असलेली कल्पनाही अशीच होती, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

बिपिन रावत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत जवळचे मानले जात होते. त्यामुळे रावत यांचा चेहरा उत्तराखंड भाजपसाठी फायदेशीर ठरू शकतो. दरम्यान, बिपिन रावत यांच्या अपघाताबद्दल वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या जात होत्या. या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथसिंह (Rajnath Singh) यांनी अपघाताची तिन्ही सैन्य दलांकडून चौकशी करण्याची घोषणा लोकसभेत केली होती. हा अपघात ढगाळ वातावरणामुळे घडला आहे, असा निष्कर्ष चौकशीने काढला आहे.

हवामानातील अचानक बदलामुळे वैमानिकामुळे हेलिकॉप्टर ढगांमध्ये गेले. यामुळे हेलिकॉप्टरची दिशा भरकटली आणि ते कंट्रोल्ड फ्लाईट इनटू टेरेनमध्ये (सीएफआयटी) गेले. यामुळे हेलिकॉप्टर कोसळले, असे चौकशीत समोर आले आहे. फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर तसेच, साक्षीदारांचे जबाब यातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या माहितीनुसार, वैमानिकाचे नियंत्रण असताना हेलिकॉप्टर जमीन, पाणी अथवा इतर अडथळ्यांना धडकून झालेल्या अपघाताला सीएफआयटी म्हणतात. रावत यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर हे सुरक्षित होते आणि अपघात घडला त्यावेळी बिघडलेले नव्हते. त्यावर वैमानिकाचे नियंत्रण होते. या अपघाताला धुकेही कारणीभूत असल्याचे समोर येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com