लालू प्रसाद यादव म्हणाले, "उठो बिहारी, करो तैयारी, जनता का शासन अबकी बारी... - Lalu Prasad Yadav's new slogan for elections | Politics Marathi News - Sarkarnama

लालू प्रसाद यादव म्हणाले, "उठो बिहारी, करो तैयारी, जनता का शासन अबकी बारी...

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

बिहारमधील मतदारांना जनतेचं राज्य आणण्यासाठी आव्हान केलं आहे. याबाबत लालू प्रसाद  यादव यांनी टि्वट केलं आहे.  

नवी दिल्ली  : बिहार विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. आजपासून आचार संहिता लागू करण्यात आली आहे. बिहारमधील राजकारण आता तापू लागलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शाब्दिकयुद्ध सुरू झाले आहे. 

बिहारचे माजी मुख्यमंत्री राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी निवडणुकीची तारीख जाहीर होताच टि्वट करत प्रसाराचं रणशिंग फुंकले आहे.  बिहारमधील मतदारांना जनतेचं राज्य आणण्यासाठी आव्हान केलं आहे. याबाबत लालू प्रसाद  यादव यांनी टि्वट केलं आहे.  

लालू प्रसाद यादव हे सोशल मीडियावर सक्रीय झाले असून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. आपल्या टि्वटमध्ये लालू प्रसाद यादव म्हणतात "उठो बिहारी, करो तैयारी, जनता का शासन अबकी बारी... बिहार में बदलाव होगा. अफ़सर राज ख़त्म होगा. अब जनता का राज होगा." 

बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. लालूप्रसाद तुरुंगात असल्याने मुख्य प्रतिस्पर्धी मैदानात नसल्याने आपण निवडणूक सहज जिंकू असे सत्ताधाऱ्यांना वाटत असले तरी तशी परिस्थितीही राज्यात नाही. लालू प्रसाद यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी लालूप्रसाद यांच्याप्रमाणे पक्षावर आपली पकड ठेवली आहे. 
 संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या तारखा जाहीर झाल्या असून तीन टप्प्यात ही निवडणूक होणार आहे. 28 ऑक्‍टोबरला पहिल्या टप्प्यासाठी, दुसऱ्या टप्प्यासाठी तीन नोव्हेंबर आणि तिसऱ्या टप्प्यासाठी सात नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

एकून 243 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे अशी माहिती देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज दिली.  तसेच दिवाळीपूर्वी म्हणजे दहा नोव्हेंबरला मतमोजणी होणार असल्याचेही अरोरा यांनी सांगितले 

आज देशभर शेतकऱ्यांनी कृषी आयोगाच्या विरोधात देश बंदची हाक दिली असताना दुसरीकडे बिहारसह मध्यप्रदेशमधील पोटनिवडणूकांच्या तारखा आयोगाने जाहीर केल्या आहेत. सुनील अरोरा यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. 

अरोरा म्हणाले, की कोरोनामुळे जगभरातील अनेक देशांनी एक तर निवडणुका रद्द केल्या आहेत. तर काही देशांनी निवडणुका पुढेही ढकलल्या आहेत. बिहार विधानसभेचे कार्यकाळ येत्या 29 सप्टेबररोजी संपत आहेत. त्यामुळे येथे निवडणूक होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात पहिल्यांदाच ही निवडणूक होत आहे.

न्यू नॉर्मलमध्ये ही निवडणूक घेण्यात येणार आहे तसेच मतदान केंद्राची संख्याही वाढणार आहे. कोरोनाचे नियम पाळूनच निवडणूक घेण्यात येणार आहे. राज्यात जेडीयूचे सरकार असून नितीशकुमार हे मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्रीपदी भाजपचे सुशील मोदी आहेत. हे सरकार सत्तेवर येण्यापूर्वी जेडीयू आणि राजदची सत्ता होती. पुढे नितीशकुमार यांनी राजदची फारकत घेऊन भाजपशी हात मिळविणी केली होती. 
  Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख