Lalu Prasad Yadav : लेकीची किडनी आली कामी; लालु प्रसाद यादवांचे किडनी प्रत्यारोपन यशस्वी

लालू यादव यांचा धाकटा मुलगा तेजस्वी यादव यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली.
Lalu Prasad Yadav
Lalu Prasad Yadav

Lalu Prasad Yadav news : बिहारचे (Bihar) माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांचे आज (५ डिसेंबर) सिंगापूरमध्ये किडनी प्रत्यारोपणाचे ऑपरेशन यशस्वी झाले. लालु प्रसाद यादव यांची धाकटी मुलगी रोहिणी आचार्य यांनीच त्यांना किडनी दान केली. ऑपरेशन झाल्यानंतर लालू आणि त्यांची मुलगी दोघेही सध्या आयसीयूमध्ये आहेत.

लालू यादव यांचा धाकटा मुलगा तेजस्वी यादव यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. वडिलांच्या मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या यशस्वी ऑपरेशननंतर त्यांना ऑपरेशन थिएटरमधून आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे. रोहिणी आचार्य आणि राष्ट्रीय अध्यक्ष (लालू प्रसाद यादव) दोघेही निरोगी आहेत. तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद." असे ट्विट करत तेजस्वी यादव यांनी आभार मानले आहेत. दरम्यान, यापूर्वी रोहिणी आचार्य यांची मोठी बहीण मीसा भारती यांनीगी रोहिणी यांचे ऑपरेशन यशस्वी झाल्याची माहिती दिली होती.

Lalu Prasad Yadav
Eknath Khadse News : खडसेंच्या घरात राजकारण; सासू विरुद्ध सून मैदानात

यापूर्वी 25 नोव्हेंबर 2022 रोजी संध्याकाळी लालू यादव सिंगापूरला रवाना झाले होते. त्यांच्यासोबत पत्नी राबडी देवी, मुलगी मीसा भारती आणि शैलेश कुमारही हे देखील सोबत होते. यावेळी, 'ऑपरेशन यशस्वी होईल यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. अनेकांच्या शुभेच्छा लालूजींसोबत आहेत, अशा भावना बिहारचे उपमुख्यमंत्री आणि लालु प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी व्यक्त केल्या

लालु प्रसाद यादव किडनीसह अनेक आजारांनी ग्रस्त आहेत. सिंगापूरमध्ये राहणारी त्यांची दुसरी मुलगी रोहिणी आचार्य यांनी त्यांना किडनी दान केली. रिपोर्ट्सनुसार, ऑक्टोबरमध्ये लालू प्रसाद यादव यांना डॉक्टरांनी किडनी ट्रान्सप्लांट करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांची मुलगी रोहिणी यांनी त्यांना वडिलांना किडनी दान करणार असल्याचं सांगितलं होतं.

तेजस्वी यादव यांच्यासह लालूंचे कुटुंब सध्या सिंगापूरमध्ये आहे. रोहिणी आचार्य यांनीही रविवारी ट्विट करून बिहारच्या जनतेला विशेष आवाहन केले होते. '' ज्यांनी लाखो लोकांना आवाज दिला, त्यांच्यासाठी आज एकत्र प्रार्थना करण्याचे आवाहन केलं होतं. त्यानंतर बिहारमध्ये विविध ठिकाणी हवन-पूजनही केले जात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com