Lalit Kumar Modi Tweet : मोदींकडून नेहरुंचा तो फोटो शेअर ; नव्या वादाला तोंड फुटलं ; काँग्रेस आक्रमक..

Lalit Modi tweet Grandparents Pics : काँग्रेस नेत्यांनी मोदींवर टीका करण्यास सुरवात केली आहे.
Lalit Kumar Modi Tweet
Lalit Kumar Modi TweetSarkarnama

Lalit Modi tweet Grandparents Pics : काँग्रेस नेता, माजी खासदार राहुल गांधी यांची खासदारकी गेल्यानंतर आयपीएलचे संस्थापक ललित मोदी यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यास सुरवात केली आहे. सलग दुसऱ्या दिवशी टि्वट करीत त्यांनी काँग्रेसला धारेवर धरलं आहे.

"राहुल गांधी यांनी कुठल्या आधारे मला फरार म्हटलं आहे. मला कधीच दोषी ठरविण्यात आलेले नाही," "विरोधीपक्षाकडे सध्या कुठलेच काम नाही, ते चुकीच्या माहितीच्या आधारे किंवा राजकीय सुडबुद्धीनं हे करीत आहेत," असे मोदी यांनी दोन दिवसापूर्वी टि्वट करीत काँग्रेसवर टीका केली होती.

Lalit Kumar Modi Tweet
Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटकच्या रणधुमाळीत हे मुद्दे चर्चेत..

ललित मोदी हे राहुल गांधींना न्यायालयात खेचणार आहेत. राहुल गांधी यांच्याविरोधात ते ब्रिटेनमध्ये गुन्हा दाखल करणार आहेत. दरम्यान गुरुवारी त्यांनी पुन्हा टि्वट करीत नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्यावरुन काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेस नेत्यांनी मोदींवर टीका करण्यास सुरवात केली आहे.

ललित मोदी यांनी आपले आजोबा-आजींचा पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यासोबतचा फोटो टि्वट केला आहे. "मोदी नगर येथे माझा जन्म झाला. माझे आजोबा रायबहादुर गुजरमल मोदी आणि आजी दयावती मोदी यांचे व्यक्तिमत्व अनोखे होते. त्यांनी आपले जीवन गरिबांच्या सेवेसाठी समर्पित केले होते. त्यांनी परिपूर्ण सामाज्य उभं केले होतं,"

Lalit Kumar Modi Tweet
Lalit Modi On Rahul Gandhi: राहुल गांधींचा पाय आणखी खोलात ; मोदी न्यायालयात जाणार ; म्हणाले, "पप्पू..साबित करो मैं..'

ललित मोदी यांनी राहुल गांधी यांना न्यायालयात खेचणार असल्याचा इशारा दिल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. "राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी नीरव मोदी, मेहुल चोकसी यांच्यावरही मोदी सरकार दबाव टाकत आहे का," असा प्रश्न काँग्रेस नेता केसी वेणुगोपाल यांनी उपस्थित केला आहे.

"जागतिक गैरव्यवहार करणारे ललित मोदी हे नरेंद्र मोदी यांच्या समर्थनासाठी हे करीत आहे का, आता काय बाकी राहिले आहे," असे वेणुगोपाल यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेता पवन खेड़ा यांनीही यावरुन मोदी सरकारवर जहरी टीका केली आहे.

नीरव मोदी, मेहुल चोकसी, विजय माल्या यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी दबाब टाकण्यात येत असल्याचे पवन खेडा म्हणाले.

"राहुल गांधी यांच्याविरोधात माझ्याकडे सर्व पुरावे,पत्ते आहेत. मी पुराव्यासह त्यांची सर्व मालमत्तांचे फोटो आणि पत्ते पाठवू शकतो. देशातील जनतेला मूर्ख बनवू नका, देशावर राज्य करण्याचा आपला हक्क आहे,असे गांधी परिवाराला वाटते," असे मोदींनी एका टि्वटमध्ये म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com