Lal Bahadur Shastri Death Anniversary : ...म्हणून आठवण येते लालबहादूर शास्त्रींची!

Lal Bahadur Shastri : देश आणि संसदेनं शास्त्रींच्या 'त्या' अभूतपूर्ण निर्णयाची प्रशंसा केली होती.
Lal Bahadur Shastri Death Anniversary News
Lal Bahadur Shastri Death Anniversary News Sarkarnama

Lal Bahadur Shastri Death Anniversary : महाराष्ट्रातील राजकारण आरोप प्रत्यारोपांनी चांगलंच गाजत आहे. भ्रष्ट्राचारासह अनेक गंभीर आरोप सत्ताधारी मंत्र्यावर करण्यात येत आहे. काही नेत्यांना तर या संबंधित प्रकरणात तुरुंगवारीही घडली आहे. मंत्रिपदाच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करुनही संबंधित मंत्र्यांनी आपल्या पदाचा स्वत: हून राजीनामा दिलेला नाही. कधी पक्षाला तर कधी मुख्यमंत्र्यांना तो घ्यावा लागला आहे. बर्याचदा सत्ताधारी पक्षाकडून तर संबंधित नेत्याला क्लिनचीटच दिली जाते.सध्या तर क्लिनचीटचं प्रमाण चांगलंच वाढल्याचंही पाहायला मिळत आहे.

नैतिकतेच्या मुद्दयावर स्वत:हून मंत्रिपदाचा राजीनामा दिलेली व्यक्ती हल्लीच्या राजकारणात दु्र्मीळच आहे. मात्र, देशाच्या राजकारणात असा धाडसी व तितकाच कौतुकास्पद निर्णय घेणारा मंत्री झाला आहे.

Lal Bahadur Shastri Death Anniversary News
BJP : अखेर भाजपचं ठरलं, नागो गाणार लढणार नागपूर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक

लाल बहादूर शास्त्री (Lal Bahadur Shastri) यांच्याकडे स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात गृह आणि रेल्वे यांसारखी महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात एका रेल्वे अपघातात अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला होता. त्यावेळी तत्कालीन रेल्वेमंत्री लाल बहादूर शास्त्री यांनी या अपघाताला स्वत : ला जबाबदार धरत आपल्या रेल्वेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.

Lal Bahadur Shastri Death Anniversary News
Hasan Mushrif ED Raid : छापेमारीनंतर हसन मुश्रीफांचा एकच सवाल ; म्हणाले,'पुन्हा कशासाठी.."

शास्त्री हे 1951 मध्ये नवी दिल्लीत आले आणि केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी रेल्वे मंत्री, वाहतूक आणि दळणवळण मंत्री, वाणिज्य आणि उदयोग मंत्री, गृहमंत्री आणि नेहरुंच्या आजारपणात बिनखात्याचे मंत्री म्हणून काम पाहिलं होतं. मात्र, एका रेल्वे अपघातात अनेक जणांना जीव गमवावा लागल्यामुळे त्यांनी स्वत:ला जबाबदार ठरवत रेल्वेमंत्री पदाचा राजीनामा (Resign) दिला. देश आणि संसदेने त्यांच्या अभूतपूर्ण निर्णयाची प्रशंसा केली .

तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु(Jawaharlal Nehru) यांनी या घटनेबाबत संसदेत बोलताना लालबहादूर शास्त्री यांची इमानदार वृत्ती आणि उच्च आदर्शमूल्यांची प्रशंसा केली होती. नेहरु म्हणाले, शास्त्री यांचा राजीनामा मी स्वीकारत आहे. कारण, यामुळे घटनात्मक मर्यादेमध्ये एक उदाहरण कायम राहील. जे काही घडले त्याला शास्त्री जबाबदार नाहीत.

यावेळी लाल बहादूर शास्त्री यांनी आपल्या म्हणाले “कदाचित माझी उंची कमी असल्यामुळे तसेच नम्र असल्यामुळे लोकांना वाटत असावं की कणखर होऊ शकत नाही. जरी मी शारीरिकदृष्टया धडधाकट नसलो तरी मला वाटते की मी आतून इतका कमकुवतही नाही असं मत व्यक्त केलं होतं.

लाल बहादूर शास्त्री यांनी जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यूनंतर मे 1964 मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळातच 1965 च्या भारत-पाक युद्धादरम्यान, जेव्हा देशाला अन्नटंचाईचा सामना करावा लागला तेव्हा त्यांनी आपलं वेतन काढणं बंद केलं. 1965 च्या युद्धात लाल बहादूर शास्त्रींच्या ‘जय जवान, जय किसान’ या घोषणेने अन्नटंचाईच्या काळात सैनिकांचे तसेच शेतकऱ्यांचे मनोबल वाढवलं. त्यांचा पंतप्रधानपदाचा कार्यकाळ अवघा 19 महिन्यांचा होता. 11 जानेवारी 1966 रोजी ताश्कंद येथे त्यांचं निधन झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com