लखीमपूर खीरी प्रकरणातील साक्षीदारावर हल्ला; सुरक्षारक्षक सोबत नसल्याचे पाहुन साधला डाव

Lakhimpur Kheri | BJP : सुरक्षारक्षक निलंबित
लखीमपूर खीरी प्रकरणातील साक्षीदारावर हल्ला; सुरक्षारक्षक सोबत नसल्याचे पाहुन साधला डाव
Lakhimpur KheriSarkarnama

दिल्ली : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) प्रकरणातील साक्षीदार दिलबाग सिंह यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. दिलबाग सिंह भारतीय किसान युनियनचे जिल्हाध्यक्ष देखील आहेत. मिळालेल्या माहितीनुसार काल (मंगळवार) अलिगंजवरुन रात्री घरी परत जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळीबार केला, सुदैवाने दिलबाग सिंह या हल्ल्यातुन थोडक्यात बचावले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, काल (मंगळवारी) रात्री दिलबाग सिंह हे अलिगंजवरुन आपल्या घरी परत जात होते. त्यावेळी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या गाडीच्या पाठीमागुन दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी गोळीबार केला. पहिला राऊंड गाडीच्या टायरवर फायर केला. त्यामुळे दिलबाग सिंह यांना गाडी थांबवावी लागली. यावेळी हल्लेखोरांनी गाडीची खिडकी खोलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी काच खाली घेवू दिली नाही. पण त्यांनी फायरिंग करतेवेळी दिलबाग सिंह यांनी सीट फोल्ड करुन स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.

यावेळी सुरक्षारक्षकांचा मुलगा आजारी असल्यामुळे ते दिलबाग सिंह यांच्यासोबत नव्हते. मात्र घटना कळताच सुरक्षारक्षक तातडीने हजर झाले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणातील सर्व साक्षीदारांना सुरक्षा पुरवण्यात येत आहे. मात्र घटनेवेळी सुरक्षारक्षक सोबत नसल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर समाजवादी पक्षाने पोलिस आणि सरकारवर गंभीर आरोप केले असून केंद्रीय मंत्री अजय मिश्र टेनी यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in