महिला कॉन्स्टेबलचा हातात रिव्हॉल्वर घेत फिल्मी स्टाईल व्हिडीओ अन् बसला दणका

प्रियांका यांनी यापूर्वीही इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर अनेक व्हि़डीओ टाकले आहेत.
Lady Constables video with revolver create controversy
Lady Constables video with revolver create controversy

आग्रा : उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एक महिला कॉन्स्टेबलची सध्या जोरदार चर्चा आहे. सोशल मीडियात सक्रीय असलेल्या या कॉन्स्टेबलने उत्साहाच्या भरात अंस काही केलं की आता खात्यानं तिची चौकशी सुरू केली आहे. झालं असं की, या कॉन्स्टेबलने हाता रिव्हॉल्वर घेत फिल्मी स्टाईलने एक व्हिडीओ तयार करून इन्स्टाग्रामवर टाकला. त्यामध्ये तिने राज्याचीच बदनामी करणारं वक्तव्य केलं होतं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तो पोलिस अधिक्षकांपर्यंत गेला अन् त्यांनी थेट चौकशीचे आदेश दिले. (Lady Constables video with revolver create controversy)

प्रियांका मिश्रा असं या महिला कॉन्स्टेबलचं नाव आहे. त्यांची नियुक्ती आग्रा येथील प्रसिध्द एमएम गेट परिसरात होती. तिथे त्यांना प्रशासकीय काम देण्यात आले होते. प्रियांका यांनी यापूर्वीही इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर अनेक व्हि़डीओ टाकले आहेत. 21 ऑगस्ट रोजीही त्यांनी कार्यालयातच एक वादग्रस्त व्हि़डीओ तयार करून तो इन्स्टाग्रामवर टाकला. काही वेळातच हा व्हिडीओ व्हायरल झाला. 

पोलिस अधिक्षक मुनिराज यांच्यापर्यंत हा व्हिडीओ पोहचला. त्यांनी वर्दीचा अपमान केल्याचा मुद्दा पुढे करून प्रियांका यांना कामाच्या ठिकाणावरून बोलावून घेतले. तसेच त्यांना कुठेही नियुक्ती दिलेली नाही. त्यांनी पोलिस अधिकारी दीक्षा सिंह यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. प्रियांका यांनी हा व्हिडीओनंतर काढून टाकला आहे. पण त्यांची वर्दीतील अनेक व्हिडीओ सोशल मीडियात आहेत. 

काय आहे व्हिडीओमध्ये...

ज्या व्हिडीओमुळं वाद निर्माण झाला आहे, त्यामध्ये प्रियांका मिश्रा यांनी राज्याचीच बदनामी केली आहे. हातात रिव्हॉल्वर घेत त्या म्हणतात, हरयाणा, पंजाब तर उगाचच बदनाम आहेत. कधीतरी उत्तर प्रदेशात या, आम्ही तुम्हाला 'रंगबाजी' काय असते, ते दाखवतो. ना गुंडगिरीवर गाणं बनवतो, ना गाडीवर जाट-गुर्जर लिहितो. आमच्याकडे पाच-पाच वर्षाची मुलंही कट्टा चालवतात...!

रिव्हॉल्वरही दुसऱ्याचा

प्रियांका मिश्रा यांनी व्हिडीओमध्ये दाखवलेला रिव्हॉल्वरही दुसऱ्याचा असल्याचं समोर आलं आहे. त्यांना खात्याकडून रिव्हॉल्वर देण्यातच आलेला नाही. आता याचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे. हा रिव्हॉल्वर कुणाचा आहे, प्रियांका यांना तो का दिला, याची चौकशी करून संबंधितांवरही कारवाई केली जाऊ शकते, असे सुत्रांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com