Kurhani By-Election 2022 : मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु होताच बेरोजगार तरुणांचा राडा ; खुर्च्यां फेकल्या..

CM Nitish Kumar : नितीश कुमार यांच्या सभेतील मारहाणीचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.
CM Nitish Kumar
CM Nitish KumarSarkarnama

CM Nitish Kumar : मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु असताना सभेत जोरदार हाणामारी झाली.. एकमेकांवर खुर्च्यां फेकल्यामुळे सभेत काही काळ तणाव निर्माण झाला होता, ही घटना बिहारमध्ये कुढनी विधानसभा पोटनिवडणुकीच्या सभेत घडली. जदयूचे उमेदवार मनोज कुशवाहा यांच्या प्रचाराच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, या रॅलीत मुख्यमंत्री नितीश कुमार सहभागी झाले होते.

रॅलीनंतर आयोजित एका सभेत नितीश कुमार हे भाषण देत होते. बिहारमधील तरुणांना रोजगार देण्याबाबत ते बोलत असताना अचानकपणे सभेतील तरुणांनी गोंधळ करण्यात सुरवात केली. त्यांनी खूर्च्या फेकण्यास सुरवात केली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.

CM Nitish Kumar
Ganesh Naik : बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या भाजपच्या आमदाराला मोठा दिलासा

सभा सुरु असताना काही तरुण हे व्यासपीठाकडे आले. त्याच्या हातात काही फलक होते. त्यावेळी सुत्रसंचालकांनी त्यांना सांगितले की 'गोंधळ करु नका, सगळ्यांना नोकऱ्या मिळतील,'त्यानंतरही या तरुणांनी गोंधळ सुरुच ठेवला. मु्ख्यमंत्र्यांचे भाषण सुरु होताच हा गोंधळ अधिकपणे वाढतच गेला.

CM Nitish Kumar
Ashok Chavan : कॉंग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांनी शिंदे-फडणवीसांचे मानले आभार..

नितीन कुमार आपल्या भाषणात म्हणाले, "केंद्र सरकार फक्त प्रचार करीत आहेत, काम करीत नाही. त्यासाठी मोदी सरकारमधून बाहेर पडलो. काही लोक अप्रचार करुन समाजाचे विभाजन करीत आहेत. 10 लाख युवकांना नोकरी आणि १० लाख जणांना रोजगारांचे साधन सरकार उपलब्ध करुन देणार आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com