कोरोना लशीचा इफेक्ट : कुंभमेळ्यात केवळ 33 पोलीस सापडले 'पॉझिटिव्ह'

जगातील सर्वांत मोठा धार्मिक उत्सव असणाऱ्या कुंभमेळ्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. कुंभमध्ये बंदोबस्ताला असलेल्या 30 पोलिसांना कोरोना संसर्ग झाला आहे.
in kumbh mela 33 police personal test positive for covid 19
in kumbh mela 33 police personal test positive for covid 19

हरिद्वार : जगातील सर्वांत मोठा धार्मिक उत्सव असणाऱ्या कुंभमेळ्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. कुंभमेळ्यात बंदोबस्तासाठी असलेल्या 10 हजार पोलिसांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यातील केवळ 30 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतल्याने त्यांचे पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण कमी आहे. 

कुंभमेळ्यात बंदोबस्तासाठी असलेल्या 10 हजार पोलिसांची प्रत्येक शाही स्नानानंतर कोरोना चाचणी करण्यात आली. आतापर्यंत दोन शाही स्नान झाले आहेत. कोरोना चाचणीत 33 पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले आहेत. पोलिसांना झालेल्या संसर्गाचा दर पाहिल्यास तो केवळ 0.3 टक्का आहे. पोलिसांनी आधी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत. याचाच परिणाम होऊन कोरोना संसर्गाचे प्रमाण पोलिसांमध्ये अतिशय कमी दिसून आले. याचबरोबर पोलिसांना घेतलेल्या खबरदारीचा फायदा झाला. 

कुंभमेळ्यातील दोन शाही स्नान झाले असून, केवळ तिसरे शाही स्नान बाकी आहे. तिसऱ्या शाही स्नानात सगळे आखाडे सहभागी होत नाहीत. त्यामुळे तेथे तैनात असलेल्या 50 टक्के पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ ठिकाणी परत बोलावण्यात आले आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या पोलिसांना लक्षणे दिसत असल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. लक्षणे नसणाऱ्या पोलिसांना गृह विलगीकरणात राहण्याची सूचना देण्यात आली आहे.    

कुंभमेळ्यात 10 ते 14 एप्रिल या कालावधीत 2 लाख 36 हजार 751 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील दोन हजार 200 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. आरटी-पीसीआर आणि रॅपिड अँटिजेन चाचण्या करण्यात येत असून, यात अनेक आखाड्यांच्या महंतांसह भाविक पॉझिटिव्ह सापडले आहेत, आणखी काही चाचण्यांचे अहवाल हाती आलेले नसून, हा आकडा वाढेल, अशी माहिती हरिद्वारचे मुख्य वैद्यकीय अधिकारी शंभूकुमार झा यांनी दिली. 

हरिद्वार, टिहरी आणि डेहराडून जिल्ह्यांत 670 हेक्टर जागेवर कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक आखाडे हे कोरोना चाचणी करुन घेण्यास नकार देत आहेत. यामुळे कोरोनाचा उद्रेक आणखी मोठा असण्याची शक्यता व्यक्त आहे. देशातील कोरोना रुग्णसंख्येत कुंभमेळ्यामुळे प्रचंड मोठी वाढ होईल, असा इशारा तज्ञ देत आहेत. 

कुंभमेळ्यात आतापर्यंत दोन शाही स्नान झाले आहेत. यातील पहिले 12 एप्रिलला आणि दुसरे 14 एप्रिलला झाले. ही पर्वणी साधण्यासाठी साधू-महंत, विविध आखाड्यांसह सुमारे 48.51लाख भाविक गंगा नदीवर आले होते. यातील बहुतांश हे मास्कविना होते. प्रचंड गर्दीमुळे सुरक्षित अंतर कुठेही दिसत नव्हते. शाही स्नानाची पुढील पर्वणी २७ एप्रिलला आहे. 

कोरोनाची दुसरी लाट देशात आली आहे. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीतही हरिद्वार येथील कुंभमेळ्यातील गर्दी कमी झालेली नाही. उत्तराखंडमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागले होते. हरिद्वारमध्ये पाच दिवसांत दोन हजारहून अधिक जणांना संसर्ग झाल्याने नियोजित वेळेआधी कुंभमेळ्याची सांगता करण्यासाठी प्रशासन आखाड्यांशी चर्चा करीत आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com