Kumar Vishwas
Kumar VishwasSarkarnama

दिल्लीत बसलेली व्यक्ती तुम्हाला धोका देईल! कुमार विश्वास यांनी मुख्यमंत्र्यांना केलं सतर्क

अरविंद केजरीवाल यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी कवी कुमार विश्वास यांच्यावर पंजाबमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी कवी कुमार विश्वास (Kumar Vishwas) यांच्यावर पंजाबमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर बुधवारी सकाळी पंजाब पोलिसांचं एक पथक त्यांच्या घरी येऊ धडकलं. याबाबत कुमार विश्वास यांनी ट्विटरवरून माहिती दिली. यावेळी त्यांनी केजरीवाल यांचं नाव न घेता पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांना सतर्क केलं आहे.

पोलीस (Police) घरी आल्यानंतर विश्वास यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, सकाळी-सकाळी पंजाब पोलीस घरी आले आहेत. मीच पक्षात आणलेल्या भगवंत मान यांना सतर्क करत आहे. तुम्ही दिल्लीत बसलेल्या ज्या व्यक्तीला पंजाबमधील (Punjab) लोकांनी दिलेल्या ताकदीशी खेळू देत आहात, ती व्यक्ती एक दिवस तुम्हाला आणि पंजाबलाही धोका देईल. देशानंही माझा इशारा आठवणीत ठेवावा, असं विश्वास यांनी म्हटलं आहे.

Kumar Vishwas
कुमार विश्वास अडचणीत; पोलीस थेट घरी पोहचले

विश्वास यांनी ट्विटमध्ये केजरीवाल यांचं नाव घेतलेलं नाही. पण त्यांचा रोख थेट केजरीवालांकडेच होता. कुमार विश्वास यांच्यावर माहिती व तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. कुमार विश्वास हे आपचे संस्थापक सदस्य आहेत. पण त्यानंतर काही काळाने त्यांनी केजरीवाल यांच्यावर टीका करत आपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. ते सातत्याने केजरीवाल यांना लक्ष्य करत असतात. पंजाब निवडणुकीदरम्यानही त्यांनी केजरीवालांवर निशाणा साधत त्यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

Kumar Vishwas
राऊत, खडसे समाज विघातक; असा झाला फोन टॅपिंगचा प्लॅन

विश्वास यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. भाजपनेही हा व्हिडीओ शअर केला होता. केजरीवाल यांना पंजाचे मुख्यमंत्री किंवा खलिस्तानचे पंतप्रधान व्हायचे आहे, असा आरोप विश्वास यांनी या व्हिडीओमध्ये केला होता. त्यावरून निवडणुकीदरम्यान राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. या व्हिडीओमध्ये विश्वास यांनी केजरीवाल यांचं नाव घेतलं नसलं तरी ते केजरीवाल यांनाच उद्देश असल्याची चर्चा होती. भाजपनेही तसा दावा केला होता.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर केंद्रीय गृह विभागाने विश्वास यांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवली होती. आपने त्यावेळी विश्वास हे भाजपला मदत करत असल्याचा आरोप केला होता. या व्हिडीओवरून विश्वास यांच्यावर पंजाबमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर बुधवारी पंजाब पोलीस थेट विश्वास यांच्या घरी पोहचले. याबाबत विश्वास यांनीच ट्विट करून माहिती दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com