कोरोना लशीचा तिसरा डोस कधी घ्यावा? भारत बायोटेकच्या अध्यक्षांनी दिलं उत्तर

यामागे राजकारण असण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली.
covaxin
covaxin sarkarnama

नवी दिल्ली : जगभरातील अनेक देशांनी कोरोना (Corona) विरुद्ध बूस्टर शॉट्ससह असुरक्षित लोकसंख्येचे लसीकरण (Corona vaccine) सुरू केले आहे. कोव्हॅक्सिन उत्पादक- भारत बायोटेकचे सीएमडी कृष्णा एला (Krishna Ella) म्हणाले की, कोरोनाविरोधी लसीचा दुसरा डोस मिळाल्यानंतर सहा महिन्यांनी बूस्टर डोस घेणे योग्य ठरेल. मात्र, त्या संदर्भातील अंतिम निर्णय सरकारचा आहे, असे त्यांनी सांगितले.

covaxin
कोरोना लसीकरणात पुणे राज्यात दुसऱ्या स्थानी

एला एका कार्याक्रमाध्ये बोलत होते. ते म्हणाले, आतापर्यंत, सरकार आणि काही तज्ञांचे मत आहे की बूस्टर डोस तातडीने गरजेचा ​​नाही. दोन डोससह संपूर्ण लसीकरण सुनिश्चित करणे हे प्राधान्य आहे. कोव्हॅक्सिनसाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून मंजुरी मिळण्यास विलंब होण्यामागे एला यांनी भारतातील लसी विरोधातल्या नकारात्मक दृष्टीकोनाला जबाबदार धरले आहे. यामागे राजकारण असण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली. ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीच्या क्षमतेवर तसंच भारतीय विज्ञान आणि नवकल्पनेवर विश्वास ठेवून कोव्हॅक्सिन लस घेतली त्यावेळी या लसीला भाजप लस किंवा मोदी लस असेही संबोधण्यात आल्याचे ते म्हणाले.

covaxin
परदेशातील वाढत्या कोरोना लाटेच्या पार्श्वभूमीवर अधिक सतर्क व्हा!

एला म्हणाले, भारत बायोटेकने विकसित केलेली नाकातील कोरोना कोव्हॅक्सिनलस दुसऱ्या डोसच्या बदल्यात किंवा पूर्वी संक्रमित व्यक्तींचे संरक्षण करण्यासाठी घेतली जाऊ शकते. वरच्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचत नसलेल्या इंजेक्शनच्या लसीच्या तुलनेत विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नाकातील लस अधिक प्रभावी असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com