
Conrad Sangma Swearing In Ceremony : मेघालय आणि नागालँड या दोन राज्यातील नव्या सरकारचा शपथविधी सोहळा आज पार पडला. कोनराड संगमा यांनी दुसऱ्यांदा मेघालयच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते.
कोनराड संगमा हे सलग दुसऱ्यांदा मेघालयच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. तर कोनराड संगमा यांचा 2004 मध्ये पराभव झाला होता. आता सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याच्या या राजकीय प्रवासात त्यांनी स्वतःला मेघालयचे चाणक्य म्हणूनही सिद्ध केले आहे.
कोनराड संगमा हे एक कुशल राजकारणी म्हणून आता प्रस्थापित झाले आहेत. यूएस आणि यूकेमध्ये शिकलेले कोनराड संगमा यांनी 2004 मध्ये पहिली निवडणूक लढवली होती. मात्र, त्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर आता कोनराड संगमा एक शक्तिशाली नेता म्हणून पुढे आले आहेत.
संगमा यांच्या पक्षाने 2018 च्या विधानसभा निवडणुकीत 19 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसने सर्वाधिक आमदार जिंकले होते. पण तरीही कोनराड संगमा यांनी इतर पक्षांसोबत आघाडी करून सरकार स्थापन केले.
यावेळीही युडीपी आणि एचएसपीडीपी तसेच अपक्षांचा समावेश असलेली युती करण्यात संगमा यशस्वी ठरले. तसेच विरोधकांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना सामोरे जाण्यासाठी त्यांनी अचूक रणनीती आखत ते पुन्हा सत्तेत आले आहेत.
आता त्यांनी 26 जागा जिंकल्या आहेत. तर मागील वेळी 19 जागा जिंकल्या होत्या. तर बहुमतासाठी 31 जागांचा आकडा गाठण्यासाठी त्यांनी पुन्हा भाजपकडे हात पुढे केला. आता कोनराड यांना भाजपच्या आमदारांचा पाठिंबाच नाही तर केंद्र सरकारचीही मदत मिळेल यात शंका नाही.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.