भाजपमधील एंट्रीनंतर अडचणीत आलेल्या मिथुनदांना न्यायालयाचा मोठा दिलासा

भाजपमध्ये दाखल होऊन नवीन राजकीय इनिंग सुरू करणारे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.
Mithun Chakraborty and Narendra Modi
Mithun Chakraborty and Narendra ModiSarkarnama

कोलकता : भाजपमध्ये (BJP) दाखल होऊन नवीन राजकीय इनिंग सुरू करणारे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मार्च महिन्यात मिथुनदा भाजपमध्ये दाखल झाले होते. यानंतर त्यांच्या विरोधात दाखल झालेला गुन्हा न्यायालयाने अखेर रद्द केला आहे.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर 70 वर्षीय अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी तृणमूल काँग्रेस व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला होता. 'मी एक नंबरचा कोब्रा आहे, डसलो तर तुम्ही फोटो बनाल,' असे डायलॉग बोलत मिथुन यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यावेळी त्यांनी आपल्या चित्रपटांतील काही डायलॉगही बोलून दाखविले होता. त्यावेळी त्यांचा हा कोब्राचा डायलॉग खूपच गाजला होता.

या भाषणातून त्यांनी हिंसेला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी कोलकत्यातील रहिवासी मृत्यूंजय पाल यांनी तक्रार केली होती. ही तक्रार ६ मे रोजी करण्यात आली होती. मिथुन यांनी त्यांच्या चित्रपटातील डायलॉग बोलून हिंसाचाराचे समर्थन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. या प्रकरणी मिथुन यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर त्यांच्या विरोधात दाखल झालेला गुन्हा रद्द करीत उच्च न्यायालयाने त्यांना मोठा दिलासा दिला आहे.

Mithun Chakraborty and Narendra Modi
गुन्हा दाखल झाल्याने काँग्रेसचा विधान परिषदेचा उमेदवार अडचणीत

मिथुनदा यांच्या भाजप प्रवेशाचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. परंतु, त्यांना विधानसभेचे तिकिट देण्यात आले नव्हते. भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या काही दिवस आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मिथुनदांची भेट घेतली होती. तेव्हाच मिथुन यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे औचित्य साधून मिथुन यांनी पक्षप्रवेश झाला होता.

Mithun Chakraborty and Narendra Modi
हेलिकॉप्टर अपघाताची भीषणता : 9 जणांचे मृतदेह अद्याप नातेवाईकांकडे दिलेच नाहीत

मिथुन चक्रवर्ती यांची राजकीय वाटचाल 2014 मध्ये सुरू झाली होती. ममता बॅनर्जी यांनी 2011 मध्ये 34 वर्षांचा डाव्या पक्षांचा गड उध्वस्त करत बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता आणली. त्यावेळी ममतांनी मिथुनदांना राजकारणात येण्याचे आमंत्रण दिले होते. हे आमंत्रण स्वीकारत त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. त्यांना लगेच राज्यसभेचे तिकीटही मिळाले. तृणमूलकडून राज्यसभा खासदार म्हणून ते निवडून गेले. पण केवळ अडीच वर्ष ते खासदार राहिले. या अडीच वर्षांच्या काळात केवळ तीन दिवस ते संसदेत उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com