Kishore Aware Murder Case : किशोर आवारे खूनाच्या गु्न्ह्यात आमदार शेळकेंना जेल की बेल ? ; हल्लेखोरांच्या स्टेटमेंटमध्ये..

Kishore Aware Murder Case : शेळकेंचे नाव,जर आले, तर मात्र त्यांना अटक करण्यात येईल,असे पोलिसांनी सांगितले.
Kishore Aware Murder Case news
Kishore Aware Murder Case newsSarkarnama

Kishore Aware Murder Case News : तळेगाव दाभाडे (ता. मावळ,जि. पुणे) नगरपरिषदेतील माजी सत्ताधारी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची चार हल्लेखोरांनी काल भरदिवसा नगरपरिषद कार्यालयासमोरच निर्घूण हत्या केली. त्याबाबत स्थानिक आमदार सुनील शेळकेंसह सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे आवारेंच्या चार मारेकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजले. त्याला अधिकृतपणे दुजोरा मिळालेला नाही. या हल्लेखोरांच्या जबानीतून आमदार शेळकेंना अटक होणार की नाही, हे ठरणार आहे. त्यांचे मोबाईलच संभाषण (सीडीआर) काढून पोलीस तपास करतील. त्यात व हल्लेखोरांच्या स्टेटमेंटमध्ये आ.शेळकेंचे नाव,जर आले, तर मात्र त्यांना अटक करण्यात येईल,असे पोलिसांनी सांगितले.

Kishore Aware Murder Case news
Kishore Aware Murder Case : किशोर आवारे खूनप्रकरणी मावळचे आमदार शेळकेंच्या विरोधात गुन्हा दाखल..

तूर्तास या गुन्ह्याची व त्याच्या तपासाची एकेक कडी जुळविण्याचे काम सुरु असल्याची माहिती तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यवान माने यांनी `सरकारनामा`ला दिली. जर, हल्लेखोरांनी आमदार शेळकेंचे नाव घेतले नाही व पोलिस तपासात त्यांचा या गुन्ह्याशी सबंध आढळून आला नाही,तर त्यांच्याविरुद्धचा हा गुन्हा आकसाने नोंद झाल्याचे समजून त्यांना अटकपूर्व जामीन न्यायालय देऊ शकते, असे अॅड. आतिष लांडगे म्हणाले.

किशोर आवारे यांच्या आई आणि तळेगावच्या माजी नगराध्यक्षा सुलोचना यांच्या फिर्यादीनुसार तळेगाव दाभाडे पोलिसांनी याप्रकरणी काल रात्रीच गुन्हा दाखल केला.त्यानंतर आमदार शेळकेंचा फोन बंद येत आहे.दुसरीकडे मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत आवारेंवर काल रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी कडक पोलिस बंदोबस्त होता. दरम्यान,या हत्येनंतर काल व आजही तळेगाव येथे काही भागात उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला.अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात वाढीव बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Kishore Aware Murder Case news
Karnataka Election Result 2023 LIVE : कर्नाटकातील या महत्वाच्या जागांवर कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर..सविस्तर वाचा

दीड महिन्यापूर्वी शिरगावचे सरपंच प्रवीण गोपाळे यांचीही आवारेंप्रमाणेच निर्घूण हत्या करण्यात आली होती. या घटनांमुळे मावळ तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही मावळात असे खून झाले आहेत.पुन्हा हे खूनसत्र सुरु झाल्याने तालुक्यातील निष्पाप जनता,मात्र पुन्हा भेदरून गेली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर यानिमित्ताने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

पूर्वी पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील हा भाग कायदा व सुव्य़वस्था चांगली राहावी या उद्देशातून पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या क्षेत्रात २०१८ ला घेण्यात आला.मात्र,तरीही गेल्या पाच वर्षात मावळासह आय़ुक्तालय हद्दीतील गुन्हेगारीचा बिमोड करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. गुन्हेगारीचा आलेख वाढतच चालला आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com