Bihar Politics: RJD नेते सुनील राय यांचे अपहरण; घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद

सुनील राय यांना पहाटेच्या सुमारास एक फोन आला होता...
Sunil Rai
Sunil RaiSarkarnama

Bihar Politics: बिहारमधील छपरा येथे आरजेडी नेत्याचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.आज (१४ मार्च) पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. काही अज्ञात लोकांनी स्कॉर्पिओ कारमधून येत त्यांचे अपहरण केल्याची माहिती आहे. (Kidnapping of RJD leader Sunil Rai: Video of the incident caught on CCTV)

सुनील रायच्या वडिलांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास कोणीतरी फोन करून सुनील यांना बाहेर बोलावले. ते त्यांच्या घराजवळील त्यांच्या कार्यालयाजवळ पोहोचले असता काही अज्ञात पांढऱ्या स्कॉर्पिओमधून तिथे आले आणि त्यांना जबरदस्तीने गाडीत ओढून घटनास्थळावरून पळ काढला. ही संपूर्ण घटना पहाटे ४.३५ च्या सुमारास घडली असावी. या सर्वांनी शस्त्रे आणि मास्क घातला होता. छापरा बाजार समितीच्या गेटवर त्ंयाचा मोबाईल खराब अवस्थेत सापडला. (Bihar Politics)

Sunil Rai
Sonia Gandhi : सोनिया गांधीसाठी आजचा दिवस आहे खास; काय आहे कारण?

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सुमारे पाच-सहा जण आले आणि त्यांनी सुनील यांना जबरदस्तीने ओढून स्कॉर्पिओमध्ये बसवल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे ते माजी सैनिकही आहेत.एअरफोर्समधून निवृत्त झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते जमीन खरेदी-विक्रीचे कामही करत आहेत. सुनील राय यांनी यापूर्वी राजदविरोधात बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. सुनील राय हे या भागातील सक्रिय नेते असून त्यांनी यापूर्वी निवडणूकही लढवली आहे.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर विशेष टीम तयार करण्यात आली आहे. पोलिसही या मोबाइलवरून कॉल डिटेल्स काढण्यात गुंतले आहेत. छपराच्या मुफसिल पोलीस स्टेशन हद्दीतील संधा गावातून आरजेडी नेते सुनील राय यांचे अपहरण झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. या घटनेमुळे पोलीस विभागातही खळबळ उडाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in