सरकार हादरलं! विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच खलिस्तानचे झेंडे

ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने झेंडे उतरवले असून विशेष तपास पथकाकडे चौकशी सोपवली आहे.
सरकार हादरलं! विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच खलिस्तानचे झेंडे
Khalistan flags found tied on the main gate of the Himachal Pradesh Legislative AssemblySarkarnama

धर्मशाळा : हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळा येथील विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच खलिस्तानचे झेंडे लावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे राज्यातील भाजप (BJP) सरकार हादरलं आहे. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने झेंडे उतरवले असून विशेष तपास पथकाकडे चौकशी सोपवली आहे. मुख्यमंत्र्यांनीही संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. (Legislative Assembly Latest Marathi News)

धर्मशाळा येथील तपोवनमध्ये विधान भवन आहे. याठिकाणचा खलिस्तानी झेंडे लावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हे झेंडे नेमके कुणी लावले, याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. राज्य आणि केंद्रीय गुप्ततर यंत्रणांच्या मदतीने आंतरराज्यीय किंवा आंतरराष्ट्रीय लिंक आहे किंवा नाही, याचा शोध घेतला जात आहे. (Khalistan flags on the main gate of the Legislative Assembly)

Khalistan flags found tied on the main gate of the Himachal Pradesh Legislative Assembly
नवनीत राणा भाजपच्या स्टार प्रचारक? रुग्णालयातून बाहेर येताच मोठी घोषणा

या विधान भवनामध्ये केवळ हिवाळी अधिवेशन होते. त्यामुळे याठिकाणी सध्या कमी सुरक्षाव्यवस्था असते. त्यामुळे हे धाडस करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. कांगडाचे पोलीस अधिक्षक खुशाल शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, हे झेंडे रात्री उशिरा किंवा पहाटे लावलेले असावेत. आता झेंडे हटवण्यातआले आहे. पंजाबमधून आलेल्या काही पर्यटकांकडूनही हा खोडसाळपणा केला जाऊ शकतो.

दरम्यान, राज्यात 26 एप्रिल रोजी एक अलर्ट देण्यात आला होता. त्यामध्ये अशी घटना घडू शकते, असं सांगण्यात आलं होतं. शीख फॉर जस्टीस या संघटनेचे प्रमुख गुरुपतवंत सिंह पन्नू यांनी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना पत्र लिहिलं होतं. त्यामध्ये त्यांनी शिमलामध्ये भिंडरावाला आणि खलिस्तानचे झेंडे फडकावले जातील, असं म्हटलं होतं. त्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे.

मुख्यमंत्री ठाकूर यांनी या घटनेचा निषेध केला आहे. रात्रीच्या अंधारात विधानसभा परिसराच्या प्रवेशद्वारावर खलिस्तानचे झेंडे लावण्याच्या घटनेचा मी निषेध करतो. या विधानसभेत केवळ हिवाळी अधिवेशन होते. त्यामुळे तिथे जास्त सुरक्षा व्यवस्था त्याच काळात असते. राज्यात शांतता कायम राहायला हवी. दोषींना तातडीने पकडले जाईल. त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असंही ठाकूर यांनी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.