Bhagavad Gita News : धर्मांतर अन् लव्हजिहादच्या चर्चेत मुस्लीम शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय

Bhagavad Gita News : केरळ (kerala)राज्यातील त्रिशूर जिल्ह्यामधील एका इस्लामिक शिक्षण संस्थेत हा विषय शिकवला जाणार आहे.
Bhagavad Gita News
Bhagavad Gita News sarkarnama

Bhagavad Gita News : धर्मांतर आणि लव्हजिहाद या विषयावर सध्या राजकारणात आणि सोशल मीडियावर वाद निर्माण झाले असतानाच आता दक्षिणेमधील एक राज्यात मुस्लिम संस्थेत शिक्षण संस्थेत भगवद् गीता (bhagavad gita) शिकवली जाणार आहे. तसेच काही हिंदू ग्रंथांचाही समावेश करण्यात आला आहे.(Bhagavad Gita latest News)

विद्यार्थ्यांना दुसऱ्या धर्माविषयी जागरुकता आणण्याच्या उद्देश्याने या प्राचीन भाषेमध्ये शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. हिजाब शिकवण्यावरुन दक्षिणेकडील राज्यात वाद पेटल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. त्यांचे पडसादही देशभर उमटले होते.

हा नवा अभ्यासक्रम यावर्षी जून महिन्यापासून नव्या शैक्षणिक वर्षापासून लागू केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात संस्कृत व्याकरणाबरोबरच संस्कृत भाषेच्या अंतर्गत भगवद गीता आणि अन्य हिंदू धार्मिक ग्रंथाचा समावेश करण्यात आला आहे. केरळ (kerala)राज्यातील त्रिशूर जिल्ह्यामधील एका इस्लामिक शिक्षण संस्थेत हा विषय शिकवला जाणार आहे.

Bhagavad Gita News
Sanjay Raut News : दावोस दौऱ्यावर गेलेल्या मुख्यमंत्र्यांना राऊतांचं खुलं आव्हान ; 'तुमच्या नाकाखालून..'

हा अभ्यासक्रम संस्कृतचे श्री शंकराचार्य विद्यापीठातील संस्कृत साहित्याचे प्रोफेसर डॉ. सी. एम. नीलाकंदन आणि केरळ विद्यापीठातील संस्कृत विभागाचे सहायक प्रोफेसर डॉ. शमीर पी. सी. यांनी संयुक्तरित्या तयार केला आहे.

Bhagavad Gita News
Pune News : महापालिकेच्या इतिहासात 'या' विभागाला मिळाले सर्वाधिक उत्पन्न

यापूर्वी संस्कृतचा अभ्यासक्रम इतका सविस्तर नव्हता. आठ वर्षांचा नवा अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून, तो 11वीपासून पदव्युत्तर पदवीपर्यंत असेल. आता विद्यार्थी संस्कृत विषयात पदवी व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेऊ शकतात, असे संस्थेत समन्वयक म्हणून कार्यरत असलेल्या हाफिज अबूबकर यांनी सांगितले.

एमआयसी द्वारे संचालित अॅडवांस्ड स्टडीजमध्ये विद्यार्थ्यांना मागील काही वर्षापासून भगवद गीता, उपनिषद, महाभारत, रामायण मधील काही निवडक भाग संस्कृतमध्ये शिकवले जात होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com