काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य...माजी मुख्यमंत्री थेट राहुल गांधींच्या भेटीला

काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद उफाळून आला असून, माजी मुख्यमंत्री ओमेन चंडी यांनी राहुल गांधींची भेट घेतली आहे.
kerala congress leader omen chandy meets rahul gandhi
kerala congress leader omen chandy meets rahul gandhi

तिरुअनंतपुरम : केरळ (Kerala) काँग्रेसमध्ये (Congress) अंतर्गत वाद उफाळून आला आहे. काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री ओमेन चंडी (Omen Chandy) यांनी थेट पक्षाचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची दिल्लीत भेट घेतली आहे. अलीकडेच राज्यात पक्षनेतृत्वाने ज्या पद्धतीने बदल केले त्याबद्दल चंडी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

केरळमध्ये विधानसभेच्या एकूण 140 जागांसाठी मतदान झाले. डाव्यांच्या लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटने (एलडीएफ) 90 जागा मिळवून बहुमत मिळवले. काँग्रेसप्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटला (यूडीएफ) 44 जागा मिळाल्या होत्या. भाजपच्या हाती असलेली एकमेव जागाही पक्षाने गमावली होती. याचवेळी एलडीएफमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने दोन जागा मिळवल्या होत्या. 

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणित संयुक्त लोकशाही आघाडीला दारुण अपयश आले आहे. केरळमध्ये स्वतः राहुल गांधी यांनी प्रचारात झोकून दिले होते. परंतु,  काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नव्हते. या निकालानंतर राज्यातील काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले होते. विरोधी पक्षनेतेपदी व्ही. डी. सथेशन तर प्रदेशाध्यक्षपदी के. सुधाकरन यांची नियुक्ती झाली आली. 

याआधी राहुल गांधी यांनी माजी विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला यांना दिल्लीला बोलावून घेतले होते. निर्णयप्रक्रियेत डावलले गेल्यामुळे चेन्निथला आणि चंडी हे दोघे दुखावले गेल्याची चर्चा आहे. याबाबत बोलताना चंडी म्हणाले की, राज्यात नुकतेच पक्षात फेरबदल करण्यात आले. याबद्दल आमच्या भावना आम्ही पक्षनेतृत्वाला कळविण्यासाठी दिल्लीत आलो होतो. या निर्णयांबाबत आमच्याच कोणतेही मतभेद नाहीत. पक्षनेतृत्वाचे निर्णय स्वीकारण्याची तयारी प्रत्येकाचीच असते. प्रत्येक जण या निर्णयांना बांधील असतो. परंतु, ज्या पद्धतीने ते करण्यात आले त्यावरून थोडी नाराजी होती. राहुल गांधींशी झालेल्या चर्चेमुळे माझे पूर्ण समाधान झाले आहे. 

केरळमध्ये विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसला धक्का देत माजी खासदार पी. सी. चाको बाहेर पडले होते. ते मागील पाच दशकांपासून केरळ काँग्रेसमध्ये सक्रीय होते. काँग्रेसमध्ये गटबाजी होत असल्याचा आरोप करत त्यांनी मार्च महिन्यात पक्षाला रामराम ठोकला होता. मात्र, कोणत्या पक्षात जाणार याबाबत त्यांनी त्यावेळी स्पष्ट केले नव्हते. मात्र, नंतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. आता ते राष्ट्रवादीचे केरळ प्रदेशाध्यक्ष आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com