Karnataka Election Result 2023: माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचा पराभव

Karnataka Assembly Election Result 2023 | कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा आज निकाल जाहीर होत आहे.
Karnataka Election Result 2023:
Karnataka Election Result 2023: Sarkarnama

कर्नाटकात हुबळी विधानसभा मतदार संघाचे उमेदवार, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचा पराभव झाल्याची माहिती समोर आली आहे.

कर्नाटकात आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार काँग्रेस १२२ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपला ७१ जागा मिळाल्या आहेत. जेडीएस २४ तर इतर पक्षांना ०७ जागा मिळाल्या आहेत. हळुहळु काँग्रेस पुन्हा एकदा विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे.

गेल्या आठ-नऊ वर्षात भाजपने भावनिकेच्या मुद्द्यावर मतं घेतली. पण विकास शुन्य. काँग्रेस नेते राहुल गांधींवर केलेला अत्याचार कर्नाटकच्या जवळून पाहिला. जेव्हा जेव्हा देशातील सत्ताधाऱ्यांनी अन्याय केला. त्याला कर्नाटकच्या जनतेने उत्तर दिलं आहे. जेव्हा जेव्हा निवडणुका आल्या तेव्हा त्यांनी हिंदु-मुस्लिम, हिंदूस्तान-पाकिस्तान, असं राजकारण केलं.गेल्या सहा महिन्यांपासून पंतप्रधान मोदी कर्नाटकमध्ये फिरत आहेत. पण जनतेने त्यांना उत्तर दिलं आहे. - कांग्रेस प्रवक्ते नसीम खान

कर्नाटकात सहा मंत्री पिछाडीवर आहेत. कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी 15,098 मतांची स्पष्ट आघाडी घेतली आहे. विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी 1224 मतांची आघाडी घेतली आहे. चामराजनगर मतदारसंघातून निवडणूक लढवणारे सोमन्ना काँग्रेसचे उमेदवार पुत्तरंगा शेट्टी यांच्यापेक्षा नऊ हजार मतांनी पिछाडीवर आहेत. काँग्रेसचे उमेदवार बी.आर. नवलगुंड जागेवर यवगल ५४४ मतांनी आघाडीवर आहेत.

काँग्रेस बहुमताकडे वाटचाल करत आहे.निवडून आलेल्या आमदारांची फोडाफोडी होऊ नये याची पुरेशी काळजी काँग्रेसकडून घेण्यात येत आहे. निवडून आलेल्या सर्वच आमदारांना बंगलोरकडे रवाना करण्यात येणार असून तिथून जयपूरला हलवले जाण्याची शक्यता काँग्रेसच्या सूत्राने व्यक्त केली आहे.

डी. के. शिवकुमार आघाडीवर आहे. बसवराज बोम्मई आघाडीवर आहेत. लिंगायत नेते जगदीश शेट्टर पिछाडीवर , काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे आघाडीवर, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आघाडीवर

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. ट्रेंडनुसार काँग्रेसने बहुमताचा आकडा ओलांडला आहे. भाजप खूपच मागे आहे. भाजप- ७३, काँग्रेस- १२१, जेडीएस- १८, इतर- २ जागा मिळाल्या आहेत.

निपाणीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तर पाटील आघाडीवर. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तम पाटील यांच्यासाठी प्रचारसभा घेतली होती.

कर्नाटकातील सर्व जागांवरील सुरुवातीचे कल हाती आले असून कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. भाजप आणि काँग्रेस या दोघांनीही शतकी खेळी केली आहे. भाजप- १०५ काँग्रेस- १०५, जेडीएस- १४ जागा मिळाल्या आहेत.

Karnataka Election Result 2023: कर्नाटकात १० मे रोजी झालेल्या मतदान प्रक्रियेनंतर आज (१३ मे) निकाल लागणार आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार भाजप, काँग्रेस चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. काँग्रेस ११२ जागांवर आघाडीवर असून भाजपला ९० जागांवर असल्याचे दिसत आहे. तर जेडीएस १९ जागा मिळाल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com