Karnataka Election Result 2023 : राष्ट्रवादी खातं खोलणार ? उत्तम पाटील आघाडीवर ; एकीकरण समिती पिछाडीवर..

Karnataka Election Result Live Updates : हुबळी धारवाडमध्ये मतदारसंघातून काँग्रेस नेते जगदीश शेट्टर पिछाडीवर आहेत.
NCP Flag
NCP FlagSarkarnama

Karnataka Election Result Live Updates : निपाणीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तम पाटील आघाडीवर आहे. शशिकला जोल्ले या पिछाडीवर आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीचा एकही उमेदवार आघाडीवर नाही. बेळगावमध्ये भाजपने ४ जागांवर आघाडी आहे. बेळगावमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. तेथील 18 जागांपैकी काँग्रेस सहा जागांवर आघाडीवर आहे तर भाजप दोन जागांवर आघाडीवर आहे.

कर्नाटक विधानसभेचे कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आघाडीवर आहेत.

रामनगरातील चन्नापटना विधानसभा मतदारसंघातून कुमारस्वामी पिछाडीवर आहेत. कनकापुरा मतदारसंघातून काँग्रेसचे डीके शिवकुमार आघाडीवर आहेत.हुबळी धारवाडमध्ये मतदारसंघातून काँग्रेस नेते जगदीश शेट्टर पिछाडीवर आहेत.

या निवडणुकीत भाजप नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धारमैया आणि जेडीएस प्रमुख एचडी कुमारस्वामी हे निवडणूक लढवत आहेत.

हुबळी आणि धारवाडमधून काँग्रेस नेते जगदीश शेट्टर लढत असून या ठिकाणी ते पिछाडीवर आहेत. शेट्टर हे निवडणुकीपूर्वीच भाजपमधून काँग्रेसमध्ये आले होते. तर कर्नाटकातील मराठी बहुल परिसरातील सहा जागांपैकी 3 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे.

NCP Flag
Karnataka Election Result 2023 : किंगमेकर होण्याचं JDSचे स्वप्न भंगलं..काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला..बोम्मई आघाडीवर

कर्नाटक विधानसभेचे कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे.

रामनगरातील चन्नापटना विधानसभा मतदारसंघातून कुमारस्वामी पिछाडीवर आहेत. कनकापुरा मतदारसंघातून काँग्रेसचे डीके शिवकुमार आघाडीवर आहेत.हुबळी धारवाडमध्ये मतदारसंघातून काँग्रेस नेते जगदीश शेट्टर पिछाडीवर आहेत.

NCP Flag
Kishore Aware Murder Case : किशोर आवारे खूनप्रकरणी मावळचे आमदार शेळकेंच्या विरोधात गुन्हा दाखल..

या निवडणुकीत भाजप नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धारमैया आणि जेडीएस प्रमुख एचडी कुमारस्वामी हे निवडणूक लढवत आहेत.

हुबळी आणि धारवाडमधून काँग्रेसनेते जगदीश शेट्टर लढत असून या ठिकाणी ते पिछाडीवर आहेत. शेट्टर हे निवडणुकीपूर्वीच भाजपमधून काँग्रेसमध्ये आले होते. तर कर्नाटकातील मराठी बहुल परिसरातील सहा जागांपैकी 3 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com