कर्नाटकला मंत्री, आमदारांचे 'सेक्स स्कँडल' नवीन नाही...याआधीही असेच प्रकार

अश्लीलव्हिडिओप्रकरणी आज कर्नाटकातील भाजपच्या एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला आहे.
Karnataka is not new to political sex scandals of MLAs
Karnataka is not new to political sex scandals of MLAs

नवी दिल्ली : अश्लील व्हिडिओप्रकरणी आज कर्नाटकातील भाजपच्या एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर कर्नाटकमध्ये खळबळ उडाली आहे. पण कर्नाटकातील राजकारणामध्ये अशी सेक्स स्कँडल नवीन नाहीत. यापूर्वीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. 

कर्नाटकमधील भाजप नेते, बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी हे एका अश्लील व्हिडिओमुळे अडचणीत सापडले होते. त्यांच्या या प्रकरणामुळे कर्नाटकमधील भारतीय जनता पार्टीच्या बी एस येडियुरप्पा सरकारसमोर नवे संकट निर्माण झाले आहे. विरोधकांनी यावरून रान उठवलं आहे. दाक्षिणात्य वृत्तवाहिन्यांवर जारकीहोळी यांचा हा व्हिडिओ दाखविला जात आहे. बेंगलुरू येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. या पार्श्वभूमीवर रमेश जारकीहोळी यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. 

भाजप नेते अरविंद लिंबावली यांचे प्रकरण 2019 मध्ये समोर आले होते. त्यांच्याशी संबंधित आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आला होते. याप्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. लिंबावली हे सध्या येडियुरप्पा सरकारमध्ये मंत्री आहेत. अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. 

विधानसभेमध्ये आमदार मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ पाहत असल्याचा व्हिडिओही पुढे आला होता. यामध्ये लक्ष्मण सावदी, कृष्णा पालेमर आणि सी. सी. पाटील हे भाजपचे तीन आमदार अडकले होते. 2012 मध्ये हा प्रकार घडला होता. सध्या सावदी हे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आहेत. तर पाटीलही येडीयुरप्पा सरकारमध्ये मंत्री आहेत. 

काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे एक आमदार विधासनभेत पॉर्न क्लीप पाहत असल्याचे समोर आले होते. काँग्रेसचे आमदार प्रकाश राठोड हे विधान परिषदेतच मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ आणि छायाचित्र पाहत असल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेची व्हिडिओ क्लीप व्हायरल झाली होती. राठोड यांनी मात्र आपण कसलेही व्हिडिओ पाहिले नसल्याचा दावा केला आहे. काँग्रेसचे नेते एच. वाय. मेटी आणि भाजपचे आमदार रेणुकाचार्य यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणांमध्ये प्रामुख्याने भाजपचेच आमदार अडकल्याचे दिसते. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com