Karnataka Maharashtra Dispute : अमित शाह यांची मध्यस्थी निष्फळ? महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही, कर्नाटकचा ठराव!

Karnataka Maharashtra Dispute : आताच्या परिस्थितीत महाराष्ट्राला आणखी एकदा डिवचणं आहे.
Karnataka Maharashtra Dispute Amit Shaha
Karnataka Maharashtra Dispute Amit ShahaSarkarnama

Karnataka Maharashtra Dispute : कर्नाटक विधिमंडळामध्ये महाराष्ट्राला एकही इंच जमीन न देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांनी हा ठराव मांडला. हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आलाय. यानंतर आता महाराष्ट्र सरकार काय भूमिका घेणार, याकडे सीमाभागातील मराठी लोकांचे आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेचे लक्ष लागले आहे.

Karnataka Maharashtra Dispute Amit Shaha
Mla Santosh Bangar : आता बांगर म्हणाले, खैरेंच्या क्लिपच बाहेर काढतो..

बसवराज बोम्मई यांनी हा ठराव मांडला आणि सत्ताधारी भाजपसह, विरोधी बाकांवर असलेले काँग्रेसचे आमदारांनीही ठरावाला मान्यता दिला. विधिमंडळात एकमताने हा ठराव संमत करण्यात आला. हा ठराव असा आहे की, सीमाभागात जी परिस्थिती या दोन राज्यात आहे ती तशीच कायम राहिल. महाजन आयोगाकडून ज्या शिफारसी करण्यात आलेले आहेत, त्या स्वीकारल्या जातील. राज्यपुनर्ऱचना आयोगाकडून जी रचना केलेली आहे, ती कायम राहिल.

कर्नाटकचा हा ठराव स्विकारणं हे आताच्या परिस्थितीत महाराष्ट्राला आणखी एकदा डिवचणं आहे. कर्नाटककडून महाष्ट्राची सातत्याने कोड काढण्यातयेत आहे. जत, अक्कलकोट या तालुक्यामधील गावं आम्हाला द्या, असं कर्नाटकाकडून विधाने होत असताना, दुसरीकडे महाराष्ट्रातील वाहनांवर कर्नाटकमध्ये दगडफेक करण्यात आली. मराठी भाषकांना तिथे मेळावाही घेऊ दिला नाही. मराठी भाषकांची धरपकड करण्यात आली. आता यावर कहर म्हणजे कर्नाटकने हा ठराव केला आहे.

Karnataka Maharashtra Dispute Amit Shaha
Winter Session : 'निर्लज्ज सरकारचा निर्लज्जपणा' : विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी!

काही दिवसांपूर्वी केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्हीकडच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली होती. याबैठकीला आपण किंमत देत नाही, अशाच प्रकारचं वर्तन कर्नाटककडून सातत्याने होत आहे. या बैठकीत न्यायालया निर्णय देत नाही तोपर्यंत कोणीही सीमाभागावर दावा करणार नाही, असे ठरले होते.मात्र कर्नाटकांकडून इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

यानंतर आता महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र भाजप काय भूमिका घेणार, याकडे सीमाभागातील मराठी लोकांचे आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेचे लक्ष लागले आहे. यावर उद्या नागपूप अधिवेशनात पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in