सरकारवर नामुष्की! पीएसआय भरतीची परीक्षाच रद्द करण्याची गृहमंत्र्यांची घोषणा

पीएसआय भरती गैरव्यवहारामुळं राज्य सरकार अडणीत
Araga Jnanendra
Araga Jnanendra Sarkarnama

बंगळूर : कर्नाटकातील पोलीस उपनिरीक्षक (PSI) भरती परीक्षा गैरव्यवहारप्रकरणी भाजप (BJP) नेत्या दिव्या हागरगी (Divya Hagargi) यांना पुण्यातून अटक झाली आहे. या प्रकरणी कर्नाटकातील भाजप सरकार अडचणीत आलं आहे. अखेर मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागल्यानंतर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गृहमंत्र्यांनी पीएसआय भरती परीक्षाच रद्द करण्याची घोषणा केली आहे. (PSI Recruitment Scam News)

कर्नाटकातील पोलीस उपनिरीक्षक भरती परीक्षा गैरव्यवहारामुळे वातावरण तापलं आहे. यावरून मोठा गदारोळ सुरू झाल्यानंतर सरकारनं ही परीक्षाच रद्द केली आहे. याबाबतची घोषणा गृहमंत्री अरगा जनेंद्र यांनी केली. ते म्हणाले की, कर्नाटक सरकारने पीएसआय भरती परीक्षा रद्द केली आहे. आता नव्याने ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील. या परीक्षेतील गैरप्रकार सीआयडी तपासात समोर आला आहे.

Araga Jnanendra
पीएसआय भरती गैरव्यवहारातील भाजप नेत्याच्या घरी गृहमंत्र्यांनी झाडली पायधूळ!

या प्रकरणी अडचणीत आल्यानंतर भाजप नेत्या दिव्या हागरगी या फरार झाल्या होत्या. अखेर त्यांनी कर्नाटक पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने पुण्यातून ताब्यात घेतले. या प्रकरणी अटक झालेल्या दिव्या या अठराव्या आरोपी आहेत. याआधी त्यांचे पती राजेश हागरगी यांना अटक करण्यात आला होती पण दिव्या फरार झाल्या होत्या. या परीक्षेतील उमेदवारांकडून लाच म्हणून प्रत्येकी 60 लाख रुपये घेण्याचा करार झाला होता. या उमेदवारांनी पेपर लिहिण्यासाठी मायक्रो ब्लूटूथचा वापर केल्याची बाब ‘सीआयडी’ तपासात समोर आली होती.

Araga Jnanendra
जिग्नेश मेवानींना दिलासा! अखेर नऊ दिवसांनंतर सुटकेचा मार्ग खुला

गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) याप्रकरणी ज्ञान ज्योती इंग्लिश मीडियम स्कूलच्या अध्यक्षा दिव्या हागरगी, शाळेचे मुख्याध्यापक काशिनाथ, अर्चना आणि शांतीबाई या शिक्षिका आणि कनिष्ठ अभियंता मंजुनाथ मेळकुंडी यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढण्याची मागणी न्यायालयाला केली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य करून या आरोपींच्या विरोधात अटक वॉरंट काढले होते. तसेच, आरोपींना एका आठवड्यात तपास यंत्रणेसमोर शरण येण्याचे निर्देशही दिले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com