येडियुरप्पांना दिलासा...उच्च न्यायालयाकडून 2 आठवड्यांचा मिळाला अवधी

मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होताच कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना उच्च न्यायालयाने समन्स बजावले होते.
karnataka high court gives 2 week time to b s yediyurappa
karnataka high court gives 2 week time to b s yediyurappa

बंगळूर : मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होताच कर्नाटकचे (Karnataka) माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांना उच्च न्यायालयाने (High Court) समन्स बजावले होते. त्यांना  भ्रष्टाचार प्रकरणी चौकशीसाठी न्यायालयासमोर आज हजर राहण्याचा आदेश देण्यात आला होता. आता या प्रकरणी आक्षेप नोंदवण्यासाठी न्यायालयाने येडियुरप्पांना दोन आठवड्यांचा कालावधी दिला आहे. यात येडियुरप्पांच्या कुटुंबीयांसह सहकारीही आरोपी आहेत. 

उच्च न्यायालयाने येडियुरप्पा, त्यांचे पुत्र व भाजपचे उपाध्यक्ष बी.वाय.विजयेंद्र यांच्यासह त्यांचे कुटुंबीय शशिधर मराडी, विरुपाक्षप्पा यामकानमराडी, संजयश्री तसेच, कंत्राटदार चंद्रकांत रामलिंगम, माजी मंत्री एस.टी.सोमशेखर, आयएएस अधिकारी डॉ.जी.सी.प्रकाश, उद्योगपती के.रवी यांना समन्स बजावले आहे. या सर्वांना न्यायालयासमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. यावर येडियुरप्पांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 

या प्रकरणात हरकत जबाब नोंदवण्यासाठी आणखी कालावधी द्यावी, अशी मागणी येडियुरप्पांनी केली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य केली आहे. येडियुरप्पा आणि इतरांना हरकत जबाब नोंदवण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी उच्च न्यायालयाने 13 सप्टेंबरला ठेवली आहे. 

गृहनिर्माण प्रकल्पात झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी दाखल झालेली याचिका उच्च न्यायालयाने मंजूर केली आहे. येडियुरप्पा हे मुख्यमंत्री असताना लोकायुक्त न्यायालयाने ही तक्रार फेटाळून लावली होती. त्यावेळी येडियुरप्पा हे मुख्यमंत्री होते, त्यामुळे त्यांच्या विरोधात खटला चालवण्यास मंजुरी नसल्याचे कारण लोकायुक्त न्यायालयाने दिले होते. या विरोधात याचिकाकर्ते व सामाजिक कार्यकर्ते टी.जे.अब्राहम यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने या प्रकरणी येडियुरप्पांसह इतरांना आज न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावले होती. 

येडियुरप्पा आणि सोमशेखर यांच्यावर खटला चालवण्यास मंजुरी न मिळाल्याने विशेष न्यायालयाने हे प्रकरण फेटाळले होते. त्यावेळी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि मंत्री होते. बंगळूर विकास प्राधिकरणाच्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी कंत्राटदाराकडून लाच घेतल्यासंबंधीचा हा खटला आहे. येडियुरप्पांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री कार्यालयाचा गैरवापर करुन कंत्राटे दिल्याचाही आरोप करण्यात आला होता. कर्नाटक विधानसभेत या विषयावर चर्चाही झाली होती. तेव्हा विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी अविश्वास प्रस्ताव आणला होता आणि गंभीर आरोप केले होते. येडियुरप्पा आणि त्यांच्या मुलाने या प्रकरणामध्ये काहीही तथ्य नसल्याचे सांगत आरोप फेटाळले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com