मोदींनी परीक्षा रद्द केली पण येडियुरप्पांनी घेतली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बारावीच्या परीक्षा रद्द केलेली असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पांनी दहावीची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
karnataka government will hold sslc exam in third week of july
karnataka government will hold sslc exam in third week of july

बंगळूर : कोरोनाच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) इयत्ता बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी घेतला होता. मोदींनी बारावीच्या परीक्षा रद्द केलेली असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पांनी (B.S.Yediyurappa) दहावीची परीक्षा (SSLC)  घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पुन्हा एकदा त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.  

केंद्रातील भाजप सरकारने सीबीएसई दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द केली आहे. यानंतर अनेक राज्यांनी दहावीसह बारावीची परीक्षा रद्द केली आहे. कर्नाटकने मात्र, दहावीची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत कर्नाटक सरकारने आज घोषणा केली. ही परीक्षा जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात होणार आहे. याचवेळी कोरोना महामारीमुळे बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. कर्नाटकमध्ये कोरोना प्रादुर्भावामुळे बारावीच्या परीक्षा मात्र, रद्द करण्यात आली आहे. यामुळे दहावीची परीक्षा घेण्याच्या येडियुरप्पा सरकारच्या निर्णयावर टीका होऊ लागली आहे. 

याबद्दल बोलताना कर्नाटकचे शिक्षणमंत्री के.सुरेश कुमार म्हणाले की, सरकारने दहावीची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात होणाऱ्या या परीक्षेत विज्ञान, गणित, समाजशास्त्र आणि भाषांसाठी आणखी एक प्रश्नपत्रिका असेल. ही प्रश्नपत्रिका बहुपर्यायी असेल आणि ती 40 गुणांची असेल. सर्व प्रश्न थेट असतील. कोरोनाचा संसर्ग झालेल्या विद्यार्त्यांसाठी पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे. आम्ही या वर्षी बारावीची परीक्षा रद्द केली आहे. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे त्यांना गुण देण्यात येतील. विद्यार्थ्यांना हे गुण कमी वाटल्यास ते परीक्षा देऊ शकतात. 

देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असली तरी देशातील अनेक राज्यांमध्ये ही स्थिती वेगवेगळी आहे. काही राज्यांमध्ये अजूनही कोरोना लाट ओसरलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता विचारात घेऊन मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सीबीएसई बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला होता. या बैठकीला केंद्रीय मंत्री अमित शहा, निर्मला सीतारामन, पीयूष गोयल, राजनाथ सिंह, प्रकाश जावडेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

सीबीएसई बारावीची परीक्षा घेण्याबाबत सर्वच राज्यांतील शिक्षण मंत्री तसेच शिक्षण मंडळांकडून सुचना मागवण्यात आल्या होत्या. त्याचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर करण्यात आला होता. केवळ काही महत्वाच्या विषयांची परीक्षा घेण्याचाही प्रस्ताव होता. त्याचप्रमाणे १८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेले विद्यार्थी, परीक्षा केंद्रांवर नियुक्त शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना लस देण्याचीही योजना होती. परंतु, पंतप्रधान मोदींनी बारावीची परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com