Karnataka Exit Poll : काँग्रेस सर्वात मोठा पक्ष पण, बहुमतापासून राहणार दूर? C-Voter चा सर्व्हे काय सांगतो?

Karnataka Aseembly Election 2023 Exit Poll : जेडीएस पुन्हा किंगमेकर होणार?
Karnataka Aseembly Election 2023 Exit Poll
Karnataka Aseembly Election 2023 Exit Poll Sarkarnama

Karnataka Aseembly Election 2023 Exit Poll : कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान पार पडले. अडीच हजारापेक्षा जास्त उमेदवारांचं भविष्य इव्हीएम' मध्ये बंद झाले आहे. मतदान प्रक्रिया झाल्यानंतर आता एक्झिट पोलचे आकडे समोर येत आहेत. एबीपी न्यूज - सी व्होटरने कर्नाटकचा विधानसभा एक्झिट पोलचा अंदाज समोर आले आहे.

पोलमध्ये अंदाज व्यक्त केल्यानुसार असं दिसतंय की, काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल. मात्र काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्यीची शक्यता धूसर दिसत आहे. यामुळे मागच्या विधानसेभेसारखं पुन्हा एकदा कुमारस्वामी यांचा जेडीएस पुन्हा एकदा किंगमेकरच्या भूमिका बजावणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पोलमध्ये अंदाज व्यक्त केल्यानुसार काँग्रेसला 100 ते 112 जागा मिळण्याची शक्यता आहे. यामुळे काँग्रेस बहुमतापासून थोडसे दूर राहण्याची शक्यता आहे. तर भाजपला 83 ते 95 जागा मिळण्याची शक्यता आहे. यामुळे भाजप सत्ता गमावण्याच्या स्थितीत आहे.

Karnataka Aseembly Election 2023 Exit Poll
Karnataka Election : मतदानानंतर शिवकुमारांची मोठी घोषणा, "म्हणाले काहीही झाले तरी..."

एक्झिट पोलच्या दाव्यानुसार, कर्नाटकमधील ग्रेटर बेंगळुरू या विभागात काँग्रेसला 39 टक्के मते मिळू शकतात, तर या ठिकणी 11-15 जागा मिळण्याचा अंदाज आहे. या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला 45 टक्के मिळतील तर 15-19 जागा भाजपच्या पदरात पडू शकतात. तर जेडीएसला या ठिकणा 13 टक्के मते मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आले आहे. या ठिकाणी जेडीएसला 1ते 4 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

ग्रेटर बंगलोर विभागात कोणाला किती मतांचा अंदाज? ( एकूण32 जागा)

  • भाजप- 45%

  • काँग्रेस - 39%

  • JDS- 13%

  • इतर - 3%

Karnataka Aseembly Election 2023 Exit Poll
Devendra Fadnavis Watched The Kerala Story: ‘द केरला स्टोरी’ बघितला, सडक्या मेंदूत येणाऱ्या विचारांना फाशी देण्याची गरज !

ग्रेटर बंगलोर प्रदेशात कोणाला किती जागा मिळण्याची शक्यता?


भाजप-15-19 जागा

INC-11-15 जागा

JDS-1-4 जागा

इतर-0-1 जागा

एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, कर्नाटकाच्या ओल्ड म्हैसूर प्रदेशात मुख्य लढत काँग्रेस आणि जेडीएसमध्ये आहे. याठिकाणी भाजपची पिछेहाट झाल्याचे दिसत आहे. काँग्रेसला 28-32 जागा तर भाजपला केवळ 0-4 जागा मिळण्यचा अंदाज आहे. जेडीएसला या ठिकाणी 19-23 जागा मिळतील तर दुसरीकडे 0-3 जागा अपक्षांच्या पदरात पडताना दिसत आहे.

जुन्या म्हैसूर प्रदेशात कोणाला किती जागा ? (55 जागा)

  • भाजप- 0-4  जागा

  • INC- 28-32 जागा

  • JDS- 19-23 जागा

  • इतर- 0-3 जागा

जुन्या म्हैसूर भागात कोणाला किती मते मिळाली?

  • भाजप- 26%

  • काँग्रेस- 38%

  • JDS- 29%

  • इतर- 7%

एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, मध्य कर्नाटक प्रदेशात काँग्रेस आणि भाजपमध्ये मुख्य लढत आहे. काँग्रेसला या ठिकाणी 18-22 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर भाजपला या ठिकाणी 12-16 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर या येथे जेडीएसला 0-2 जागा मिळतील असा अंदाज आगे. 0-1 जागा अपक्षांना मिळेल.

मध्य कर्नाटक विभागात कोणाला किती जागा मिळतील? (35 जागा)

  • भाजप- 12-16  जागा

  • INC- 18-22 जागा

  • JDS- 0-2 जागा

  • इतर- 0-1 जागा

मध्य कर्नाटक विभागात कोणाला किती मते?

  • भाजप-39%

  • काँग्रेस-44%

  • JDS-10%

  • इतर 7%

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com