Karnataka Election : मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती कुणाला? कानडी जनतेचा कौल काय?

Karnataka Assembly Election 2023 : काँग्रेस भाजपकडून सत्ता खेचणार?
Karnataka Assembly Election 2023 :
Karnataka Assembly Election 2023 :Sarkarnama

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक (Karnataka) विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहचली आहे. काँग्रेस, भाजप, जेडीएससह साऱ्याच पक्षांनी जोरदार प्रचाराचा मोर्चा पुकारला आहे. सर्वांनीच आपली सत्ता येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान कर्नाटक निवडणुकांसंदर्भात एबीपी-सी व्होटर संस्थेचा ओपिनिअन पोल घेतला आहे.

Karnataka Assembly Election 2023 :
Karnataka Election : BJP उमेदवाराची JDS च्या उमेदवाराला धमकी ; Audio Clip व्हायरल ; अर्ज मागे घ्या, अन्यथा..

कर्नाटक निवडणुकीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. कर्नाटक निवडणूक देशाची दिशा ठरवणारी निवडणूक असेल असेही बोलले जात आहे. कर्नाटकात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) व काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) कर्नाटकात ठाण मांडून आहेत. प्रचाराच्या तोफा धडाडत आहेत. या सर्वात कर्नाटकाची जनता कोणाला कौल देणार? याबाबत उत्सुकता आहे.

दरम्यान, निवडणूक काही दिवसांवर असताना सी व्होटर संस्थेचा निकाल आला. या सर्व्हेनुसार कर्नाटकात काँग्रेस स्वबळावर बहुमताचा आकडा गाठेल, असा दावा केला आहे. तर भाजपला ७० ते ८० जागा मिळण्याचा अंदाज आहे.

तसेच, या निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती? असा प्रश्न विचारला असता तर काँग्रेसच्या मुख्यंत्र्यांनी कर्नाटकचा लोकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्री सिद्धरामैया यांना ४१ % लोकांनी पसंती दिली आहे. तर विद्यमान मुख्यमंत्री बसवराज यांना ३१ % लोकांनी पसंती दिली आहे.

मुख्यमंत्रिपदासाठी कुणाला पसंती?

बसवराज बोम्मई - 31%

सिद्धरामैया -41%

कुमारस्वामी - 22%

डी के शिवकुमार - 3%

इतर - 3%

Karnataka Assembly Election 2023 :
Karnataka Election : कर्नाटकात काँग्रेस सरकार बनवणार; सी व्होटर सर्व्हेची आकडेवारी काय सांगते?

कर्नाटकाचे चित्र काय? कौल कुणाला?

एबीपी-सी वोटर सर्व्हेच्या दावा -

विधानसभेच्या एकूण जागा 224 -

काँग्रेस - 107 ते 119 जागा

भाजप - 76 ते 86 जागा

जेडीएस - 23 ते 35

इतर - 0-5 जागा

पाच वर्षात राज्य सरकारची कामगिरी कशी?

चांगली - 29%

सरासरी - 19%

वाईट - 52%

मुख्यमंत्र्यांची कामगिरी कशी राहिली ?

चांगले - 25%

सरासरी - 24%

वाईट - 51%

पंतप्रधान मोदी यांचे काम कसे आहे ?

चांगले - 49%

सरासरी - 18%

वाईट - 33%

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com