Karnataka Election Result 2023 Live : कर्नाटकात भाकरी फिरणार ? ; BJP ला सुरुंग लागणार की काँग्रेस बाजी मारणार?

Karnataka Assembly Election Result 2023 : भाजप सत्ता कायम ठेवणार की काँग्रेस सत्तेत येणार हे अवघ्या काही तासांमध्ये ठरणार आहे
Karnataka Assembly Election Result 2023
Karnataka Assembly Election Result 2023 Sarkarnama

Karnataka Assembly Election Result 2023 : कर्नाटक विधानसभेच्या मतमोजणीस सुरवात झाली आहे. आज होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (karnataka election results 2023 live updates vote counting today)

एक्झिट पोलनुसार काँग्रेसचं पारड जड आहे. त्यामुळे भाजपला ही निवडणूक जनतेचा लाल झेंडा दिसणार का? काय आहे मतदारांचं कौल याकडे सर्वांचा नजरा लागल्या आहेत. आज दुपारपर्यंत हा निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Karnataka Assembly Election Result 2023
Supreme Court Final Decision : उद्धव ठाकरेंचा नार्वेकरांना थेट इशारा ; चुकीचा निर्णय दिला तर ..

काँग्रेस, भाजप, जेडीएस आपापल्या विजयाचा दावा करत आहेत. राज्यात आतापर्यंत 14 विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. 8 निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढली, ज्यामध्ये 1962 मध्ये काँग्रेस फक्त एकदाच सत्तेवर आली. त्याच वेळी, पाच निवडणुकांमध्ये मतांची टक्केवारी कमी राहिली, ज्यामध्ये भाजप एकदाच सत्तेत परतला.

राजकीय पक्षांनी सुमारे महिनाभर प्रचार केल्यानंतर आता राज्यातील जनता सत्तेच्या चाव्या कुणाकडे देणार हे आज ठरणार आहे. भाजप सत्ता कायम ठेवणार की काँग्रेस सत्तेत येणार हे अवघ्या काही तासांमध्ये ठरणार आहे

Karnataka Assembly Election Result 2023
Jayant Patils ED Summons: जयंतराव, कर नाही, तर डर कशाला ? ; ED च्या नोटीसवरुन भाजपनं डिवचलं ; भावनिक कार्ड सोडा..

एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसार सत्ताधारी भाजपची धाकधूक वाढली आहे. कारण, बहुतांश पोल्समध्ये भाजपचा पराभव, तर काँग्रेसच्या विजयाचं भाकित वर्तवण्यात आलं आहे. इंडिया टुडे- अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, काँग्रेसला सर्वाधिक 122 ते 140, तर भाजपला 62 ते 80 जागा मिळवण्याची शक्यता आहे. तसचं, जेडीएसला 20 ते 25, तर इतरांना 0 ते 3 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

  • कर्नाटक निवडणुकीत 2,615 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

  • कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये कलम 144 लागू करण्यात आला आहे.

  • 72.67 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

  • पहिल्यांदाच 73.19% मतदान, गेल्या निवडणुकीपेक्षा 1% जास्त

  • 10 मे रोजी 224 जागांसाठी 5.13 कोटी मतदारांनी 2,615 उमेदवारांना मतदान केले.

  • ७३.१९ टक्के मतदान झाले आहे. 1957 नंतर राज्याच्या निवडणूक इतिहासातील हा उच्चांक आहे.

  • कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल results.eci.gov.in वर प्रसिद्ध केले जातील.

    (Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com