Karnataka Election Result : ऑपरेशन लोटस् घडवून फोडाफोडी करणे भाजपला महागात? १८ पैकी बहुतांश आमदार...

Karnataka Assembly Election Result 2023 : मतदारांना फोडीफोडीचं राजकारण आवडलं नाही?
Karnataka Election Result :
Karnataka Election Result :Sarkarnama

Operation Lotus News : कर्नाटकात काँग्रेसने बहुमतापेक्षाही जास्त जागा मिळवत निर्भेळ यश मिळवले आहे. बऱ्याच मोठ्या कालखंडानतंर या दणदणीत विजयामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसमध्ये चैतन्याचं वातावरण पसरले आहे. कर्नाटक जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी सभा आणि रँली करत जंगजंग पछाडले होते. मात्र इथे भाजपला विजयी करण्यात मोदींचा करिश्मादेखील प्रभाव दाखवू शकला, मात्र भाजपला विजय मिळवून देण्यात मोदींचा करिष्मा देखील कमी पडला. भाजपच्या पराभवाची वेगवेगळी कारणे समोर येत आहेत. (Karnataka Assembly Election Result 2023 )

Karnataka Election Result :
Karnataka Election Result: कर्नाटकात काँग्रेसचा ऐतिहासिक विजय; मोदींनी केलं काँग्रेसचं अभिनंदन, म्हणाले...

कर्नाटकातील भाजपच्या पराभवाचं सर्वात प्रमुख कारण भाजपने चालवलेलं ऑपरेशन लोटस देखील कारणीभूत ठरल्याचं बोललं जात आहे. भाजपने कर्नाटकमधील ऑपरेशन लोटस घडवून यापूर्वीचं काँग्रेस-जेडीएसचं सरकार पाडलं होतं. यावेळी भाजपने काँग्रेस-जेडीएस आणि दोन अपक्ष असे एकूण 18 आमदार आमदारांना फोडले होत. ऑपरेशन लोटस घडवून भाजपने कर्नाटकात सत्तास्थापन केली होती.

मात्र आजच्या निकालात भाजपने ऑपरेशन लोटस घडवून आपल्याकडे घेतलेले १८ आमदारांपैकी बहुतांश आमदारांना पराभवाचा सामना करावा लागला. या पराभूत आमदारांमध्ये काँग्रेसचे १३, जेडीएस पक्षाचे ३ तर अपक्ष २ आमदार होते. मात्र १८ आमदारांपैकी फक्त सहा आमदार विजय मिळवता आला. तर यापैकी दोन उमेदवारांनी निवडणुकच लढवली नव्हती.

Karnataka Election Result :
Karnataka Election Result : एकही दिवस प्रचार न करता...मतदारसंघात न जाताही मिळविला काँग्रेस उमेदवाराने विजय

कसं घडलं होतं ऑपरेशन लोटस ?

कर्नाटकात पाच वर्षांपूर्वी कर्नाटकात परिस्थिती काही वेगळीच होती.२०१८ मध्ये निवडणुकीत भाजपला १०४ काँग्रेसला ८० आणि जेडीएस ला ३७ जागा मिळाल्या. कोणत्या पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्णण झाली . त्यानंतर राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला बहुमताच्या चाचणीची संधी दिली. पण भाजप बहुमत सिद्ध करु न शकल्याने येडियुरप्पा यांना राजीनामा द्यावा लागला. यानंतर कर्नाटकात काँग्रेस -जेडीएस चे सरकार स्थापन झाले. आश्चर्यकारकरित्या एच.डी. कुमारस्वामी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली.

Karnataka Election Result :
Karnataka Election 2023: बंडखोरी, 'ऑपरेशन लोटस'च्या धक्क्यानंतर काँग्रेसचा मोठा विजय; काय घडलं होतं २०१९ मध्ये?

मात्र २०१९ मध्ये ऑपरेशन लोटस राबवत काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार फोडले आणि पुन्हा येडियुरप्पा मुख्यमंत्री झाले. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने जेडीएसला मुख्यमंत्रीपद दिलं. पण यामुळे काँग्रेसचेच अनेक आमदार नाराज झाले. काँग्रेस वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या बंडखोरीच्या भाषेमुळे मुख्यमंत्री कुमारस्वामी हतबल झाले होते.

अखेर एक दिवस काँग्रेस आणि जेडीएसच्या १२ आमदारांनी बंडखोरी करत राजीनामा दिला. पुढे आणखी चार आमदारही बाहेर पडले आणि एकूण 16 आमदार सत्ताधारी पक्षापासून दूर झाले. या बंडखोरीत दोन अपक्ष नेत्यांनीही काँग्रेस सरकारचा पाठिंबा काढून घेत भाजपला पाठिंबा दिला. (Karnatak Election Result 2023 Latest news Update)

हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने कुमारस्वामी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले, पण कुमारस्वामी बहुमत सिद्ध करु शकले नाहीत. अखेर कुमारस्वामी यांना राजीनामा द्यावा लागला आणि राज्यात पुन्हा एकदा भाजपची सत्ता स्थापन झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com