Karnataka Election Result : किंगमेकर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या JDS ला 'अशी' लागली उतरती कळा?

Karnataka Assembly Election Result 2023 : जेडीएसला मतदारांनी नाकारत, संधीसाधू राजकारणाचा केला सुपडा साफ..
Karnataka Election Result : HD kumarswami
Karnataka Election Result : HD kumarswamiSarkarnama

Karnataka Assembly Election Result 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमतापेक्षा अधिक संख्याबळ मिळाले आहे. जनतेने भाजपचा सपशेल पराभव केला, तर नेहमीच किंगमेकर म्हणून उभ्या राहणाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या जेडीएस पक्षालाही जनतेने धडा शिकवला आहे. मागील वेळेपक्षा जेडीएसच्या जागा निम्म्याने घटले आहे. यामुळे कर्नाटकी जनतेने संधीसाधू राजकारणाला नापसंत करत, जेडीएसचा सुपडा साफ केला आहे.

1999 मध्ये जेडीएसच्या स्थापनेपासून, माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या अस्तित्वावरच राज्यातील निवडणुकांमधून नेहमीच प्रश्नचिन्ह उमटत आले आहे. ज्या पक्षाचा पंतप्रधान होता, त्या जेडीएस पक्षाला स्थापनेपासून 24 वर्षांनंतरही स्वबळावर सरकार स्थापन करता आले आहे. जेडीएस सत्तेत येण्यासाठी राज्यातील दोन प्रमुख पक्षांची नेहमी साथ घ्यावी लागली.

Karnataka Election Result : HD kumarswami
Karnataka Chief Minister : कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाबाबत काँग्रेस अध्यक्ष खर्गेंचे मोठे विधान

जेडीएस आतापर्यंत कर्नाटक विधानसभेत दोन वेळा सत्तेत होती. 2006 आणि 2018 मध्ये, जेडीएस नेत्यांनी अनुक्रमे भाजप आणि काँग्रेसला सरकार स्थापन करण्यास मदत केली आणि राज्यात सत्ताधारी पक्षात बसले. JDS ची स्थापना जुलै 1999 मध्ये एचडी देवेगौडा यांनी जनता दलापासून फारकत घेतल्यानंतर केली होती.

JDS ला किंगमेकरचा टॅग कसा मिळाला?

जेडीस स्थापनेनंतर लगोलग सप्टेंबर 1999 मध्ये झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात होता. पहिल्या वहिल्या निवडणुकीत आपल्या पक्षाची चुणूक दाखवत त्यांनी 10 जागा जिंकल्या होत्या. यानंतर जेडीएसला तयारीसाठी वेळ मिळाला आणि 2004 च्या निवडणुकीत ते प्रबळ दावेदार बनले. यादरम्यान जेडीएसला पहिल्यांदाच किंगमेकरची भूमिका साकारण्याची संधी मिळाली.

Karnataka Election Result : HD kumarswami
Winning Strategy of DK Shivkumar: काँग्रेसच्या विजयासाठी अशी होती डी.के. शिवकुमार यांची रणनीती?

2004 च्या निवडणुकीत भाजपला 79 तर काँग्रेसला 65 जागा मिळाल्या होत्या. तर जेडीएसने 58 जागा जिंकून काँग्रेसला पाठिंबा दिला. त्यावेळी धरम सिंह हे मुख्यमंत्री बनले, जे काँग्रेसचे होते, पण 2006 मध्ये जेडीएसने काँग्रेसच्या पायाखालची जमीन सरकवली आणि धरम सिंह सरकार पडले. त्या काळात एचडी कुमारस्वामी यांनी भाजपला मदत केली आणि ते कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले. बीएस येडियुरप्पा उपमुख्यमंत्री झाले.

2008 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप 110 जागा मिळवून कर्नाटकात सत्तेवर आला होता. 224 सदस्यांच्या विधानसभेत 113 च्या बहुमतामुळे भाजप थोडा मागे पडला, पण भाजपने सहा अपक्ष उमेदवारांच्या मदतीने सरकार स्थापन केले. त्या निवडणुकीत काँग्रेसला 80 तर जेडीएसला 28 जागा मिळाल्या होत्या.

Karnataka Election Result : HD kumarswami
Karnataka Next CM: कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार?; डी के शिवकुमार यांनी दिले स्पष्ट संकेत

2013 मध्ये, काँग्रेस 122 जागांसह कर्नाटकातील सर्वात मोठा पक्ष ठरला. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या निवडणुकीत जेडीएसला 40 जागा मिळाल्या, मात्र काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला. त्यामुळे जेडीएसची त्यात कोणतीही भूमिका नव्हती.

2018 च्या निवडणुकीत भाजपला 104, काँग्रेसला 80 आणि जेडीएसला 37 जागा मिळाल्या होत्या. बीएस येडियुरप्पा हे भाजपचे मुख्यमंत्री झाले, मात्र पूर्ण बहुमत नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सभागृहाच्या पटलावर बहुमत सिद्ध करण्यास सांगितले, यामुळे 72 तासांच्या आत त्यांनी राजीनामा दिला.

दरम्यान, काँग्रेसने जेडीएससोबत राज्यात सरकार स्थापन केले आणि जेडीएसला पुन्हा किंगमेकरची भूमिका बजावण्याची संधी मिळाली. मात्र, हे सरकार केवळ 14 महिनेच टिकले, कारण भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'मुळे सत्ताधारी आघाडीचे 17 आमदार आणि दोन अपक्ष भाजपमध्ये दाखल झाले. त्यानंतर भाजपने सरकार स्थापन केले आणि येडियुरप्पा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले.

जेडीएसची मतांची टक्केवारी कमकुवत राहिली :

मतांची टक्केवारी पाहिली, तर जेडीएस निवडणुकीच्या रिंगणात का आहे, हे स्पष्ट होते. 2013 मध्ये काँग्रेसने स्वबळावर बहुमत मिळवले. तथापि, 2018 मध्ये भाजपचे पुन्हा सत्तेत पुनरागमन आणि जेडीएसला चांगली कामगिरी दाखवल्याने काँग्रेसच्या 19 टक्के जागा कमी झाल्या आहेत.

Karnataka Election Result : HD kumarswami
Devendra Fadanvis On Karnataka : आमचा रेट इतरांपेक्षा चांगला, कधी जिंकतो कधी हरतो...

आता चित्र काय?

विधानसभा निवडणुकीत जेडीएसच्या मतांचा मोठा हिस्सा काँग्रेसकडे वळल्याचे स्पष्ट झाले आहे. जेडीएसच्या पारंपरिक मतदारांनी

काँग्रेसला पदरात मतांचे दान टाकले. यामुळे जेडीएसची किंगमेकर बनण्याची सद्दी संपली. दक्षिण कर्नाटकात जेडीएसची चांगली पकड आहे. येथे भाजप आणि काँग्रेसची परिस्थिती प्रभावी नाही.

गेल्या दोन निवडणुकांमध्ये जेडीएसने दक्षिण कर्नाटकातील उप-प्रदेशांतून निम्म्याहून अधिक जागा जिंकल्या होत्या. पण, या निवडणुकीत भाजपच्या विरोधात मजबूत सत्ताविरोधी लाटेचा परिणाम जेडीएसवरही दिसून आला. जेडीएसची मतेही काँग्रेसच्या पदरात पडली.

जुन्या म्हैसूर भागात वोक्कालिंगा, मुस्लिम आणि अनुसूचित जातींमध्ये जेडीएसच्या मतांची टक्केवारी घटली आहे. या मतांचा मोठा हिस्सा काँग्रेसकडे गेला आहे. तसेच, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांची एससी/एसटी आणि ओबीसी वर्गांमधील लोकप्रियता हेही यासाठी प्रमुख कारण बनले.

Karnataka Election Result : HD kumarswami
Karnataka Election Result: कर्नाटक निवडणुकीत आणखी एक विक्रम; तीन सख्खे भाऊ झाले पुन्हा आमदार

मागील विधानसभा निवडणुकीचे आकडे काय?

जेडीएस -

1999 मध्ये 10 जागा

2004 मध्ये 58 जागा

2008 मध्ये 28 जागा

2013 मध्ये 40 जागा

2018 मध्ये 37जागा

काँग्रेस -

1999 मध्ये 132 जागा

2004 मध्ये 65 जागा

2008 मध्ये 80 जागा

2013 मध्ये 122 जागा

2018 मध्ये 80 जागा

भाजप -

मध्ये 44 जागा,

2004 मध्ये 79 जागा

2008 मध्ये 110 जागा

2013 मध्ये 40 जागा

2018 मध्ये 104 जागा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in