Karnataka Election Result 2023 : कर्नाटकात भाजपच्या पराभवाची ही आहेत प्रमुख कारणं ..

Karnataka Election Result 2023 BJP : कर्नाटकात भाजपच्या पराभवाची ही आहेत प्रमुख कारणं ..
Karnataka Election Result 2023 BJP
Karnataka Election Result 2023 BJP Sarkarnama

Karnataka Election Result 2023 BJP : कर्नाटकात काँग्रेसने भाजपचा सुपडा साफ केला आहे. आत्तापर्यंतच्या कलांनुसार काँग्रेसने स्पष्टपणे बहुमत मिळवले आहे. एक्झिट पोलनुसार, कर्नाटकात काँग्रेस सरकार स्थापन करणार असल्याचा दावा खरा ठरत आहे. कर्नाटकच्या जनतेने भाजपला का नाकारलं, याची काही कारणे समोर येत आहेत.

विधानसभा निवडणुकीत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ४२ रॅली झाल्या. दोन दिवस रोड शो झाले. मोदींसारखे नेतृत्वही निवडणुकीत उतरलं होतं. तरीही भाजपचा पराभव झाला. यामागील कारणे जाणून घेऊयात

Karnataka Election Result 2023 BJP
Karnataka Election Result 2023 : कोण होणार कर्नाटकचे मुख्यमंत्री ? डी. के. शिवकुमार की सिद्धरामय्या..
 • भाजपनं फक्त मोदींच्या भरोसे ही निवडणूक लढवली, स्थानिक मुद्यांकडे दुर्लक्ष केल्याने मतदारांनी त्यांना नाकारलं.

 • मोदींप्रमाणे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याही ३० रॅली येथे झाल्या. पण त्याचा फायदा झाला नाही.

 • काँग्रेसच्या डी.के.शिवकुमार, सिद्धरामय्या यांना शह देण्यासाठी स्थानिक चेहरा भाजपला देता आला नाही.

 • डी.के शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्या मोठा प्रभाव आहे, या दोघांसारखे नेतृत्व भाजपला देता आले नाही.

Karnataka Election Result 2023 BJP
Karnataka Election Result 2023 : बेळगाव दक्षिणमध्ये कमळ फुललं ; अभय पाटील विजयी ; एकीकरण समितीचे कोंडूसकर पराभूत
 • बसवराव बोम्मई हे लिंगायत समाजाचे आहे, पण ते मतदारांवर प्रभाव पाडू शकले नाहीत.

 • 40 टक्के कमिशन घेणारे सरकार,या काँग्रेसच्या आरोपाचे खंडण भाजपला करता आले नाही.

 • "40 टक्के कमिशन घेणारे सरकार" हे काँग्रेचे अभियान यशस्वी ठरलं.

 • स्थानिक मुद्यांवर भाजपला प्रचार करता आला नाही.

 • अनुसूचित जाती-जमातींना आकर्षित करण्यात भाजपला अपयश आलं.

 • मलिक्कार्जून खर्गे यांच्यामुळे काँग्रेसला दलित समाजाकडून मोठा फायदा

 • लिंगायत नेते म्हणून येडियुरप्पा हे कर्नाटकात भाजपची ताकद आहेत. त्यांच्याकडे भाजपनं दुर्लक्ष केलं.

 • भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचारामुळे लोक नाराज असल्याचे काँग्रेसने मतदारांना पटवून दिलं

 • राज्याच्या राजकारणात दिल्लीचा हस्तक्षेप स्थानिक भाजप नेत्यांना आवडला नाही.

 • तिकीट वाटपानंतर अनेकांनी याच कारणासाठी भाजपचा निरोप घेतला.

 • लिंगायत समाजाचे दोन मोठे नेते जगदीश शेट्टार आणि लक्ष्मण सवदी हे भाजप सोडून काँग्रेसमध्ये सहभागी

 • शेट्टार आणि सवदी यांच्या काँग्रेसप्रवेशामुळे भाजपचे मोठे नुकसान

  (Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in