Karnataka Election JDS News : माजी पंतप्रधानांच्या सुनेचं तिकीट कापलं..; वहीनींना डावलून सामान्य कार्यकर्त्यांला..

JDS News : कुमारस्वामींनी आपल्या वहीनींना तिकीट देण्याऐवजी एका सामान्य कार्यकर्त्यांला तिकीट देणं पसंत केलं आहे.
Karnataka Election JDS News
Karnataka Election JDS NewsSarkarnama

Kumaraswamy Gave Ticket to this Common Worker From Hassan : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्वात जुना प्रादेशिक पक्ष जनता दल सेक्युलरने (JDS) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात ९३ जणांची नावे आहेत. या यादीमुळे माजी पंतप्रधान एचडी.देवेगौडा परिवारातील वादाला पूर्णविराम मिळाला आहे.

जेडीएसचे नेते कुमार स्वामी यांनी ही यादी प्रसिद्ध केली. आपल्या वहीनींना तिकीट न देण्याचा निर्धार त्यांनी पूर्ण करुन दाखवला आहे. कुमारस्वामींनी आपल्या वहीनींना तिकीट देण्याऐवजी एका सामान्य कार्यकर्त्यांला तिकीट देणं पसंत केलं आहे.

Karnataka Election JDS News
Hema Malini Apologize : बॉलीवुड 'ड्रीम गर्ल' BJP खासदार नेटकऱ्यांच्या निशाण्यावर ; चुकीला माफी नाही.., Tweet आलं अगंलट..

कुमारस्वामींनी आपल्या पक्षासाठी या निवडणुकीत खूप मेहनत घेत असल्याचे दिसते. निवडणुकीची तारीख घोषित होण्याआधीच त्यांनी पहिली यादी जाहीर केली होती. हासन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी त्यांच्या वहीनी भवानी रेवन्ना या इच्छुक होत्या. पण त्यांच्या उमेदवारीला एचडी कुमारस्वामी यांनी पहिल्यापासून विरोध केला होता.

भवानी रेवन्ना या माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे थोरले सुपुत्र माजी मंत्री एचडी रेवन्ना यांच्या पत्नी आहेत. भवानी रेवन्ना या हासन जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आहेत. कुमारस्वामी यांनी तिकीट नाकारल्यामुळे हासन मधून आमदार होण्याचे भवानी रेवन्ना यांचे स्वप्न भंगले आहे. हासनमधून कोण निवडणूक लढणार यावरुन अनेक दिवसापासून देवेगौडा परिवाद वाद सुरु होता. आता हा वाद संपल्याचे दिसते.

दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा झटका बसला आहे. भाजप नेता, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी आज (शुक्रवारी) काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी ही माहिती दिली आहे.

Karnataka Election JDS News
Karnataka Election 2023 : भाजपला मोठा झटका ; तिकीट न मिळाल्याने माजी उपमुख्यमंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश..

दोन दिवसापूर्वी सावदी यांचे भाजपने तिकीट कापले होते. तेव्हापासून ते नाराज होते, ते अथानी विधानसभा मतदार संघातून निवडणुक लढण्यास इच्छुक होते. यापूर्वी काँग्रेसमधून अनेक मोठे नेते भाजपमध्ये सामील झाले आहेत, पण सावदीच्या या पक्षप्रवेशामुळे भाजपमधून मोठा नेता काँग्रेसमध्ये आला आहे.

Karnataka Election JDS News
Karnataka Election 2023 : वडीलांची राजकीय गादी जिंकण्यासाठी सख्ये भाऊ आमने-सामने

भाजपाने उमेदवारांच्या पहिल्या यादीत एकूण ५१ लिंगायत समाजाच्या नेत्यांना तिकीट दिले आहे. २०१८ साली भाजपाने ५५ जागांवर लिंगायत समाजाच्या उमेदवारांना तिकीट दिले होते. ही निवडणूक लिंगायत समाजाचे नेते बीएस येडियुरप्पा यांच्या नेतृत्त्वात लढण्यात आली होती.

भाजपाच्या पहिल्या यादीत येडियुरप्पा यांच्या १२ कट्टर समर्थकांना उमेदवारी देण्यात आली आहे. बीएस येडियुरप्पा यांचे पुत्र बीवाय युजवेंद्र यांच्यासह काँग्रेस आणि जेडीएसकडून प्रलोभन देण्यात आलेल्या १४ लोकांनाही (यामध्ये १२ आमदारांचा समावेश आहे.) भाजपाने यावेळी तिकीट दिले आहे.

(Edited By Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com